धाराशिवच्या उमरगामधील तिरुपती ग्रुपचा अनोखा उपक्रम, वाढदिवसाला केक नाही कापत तर...

Last Updated:

tirupati group omerga - याठिकाणी वाढदिवसावर कोणताही अवांतर खर्च केला जात नाही. जसे की फटाके वाजवले जात नाहीत किंवा कोणताही अनावश्यक खर्च केला जात नाही.

+
तिरुपती

तिरुपती ग्रुपचा अनोखा उपक्रम

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव - वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे अनेकजण आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. काही जण तर वाढदिवसाच्या दिवशी एक नव्हे त्यापेक्षा जास्त केक कापतात, असेही दिसून येते. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील तिरुपती ग्रुपच्या माध्यमातून एक अनोखे कार्य केले जात आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा आढावा.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील तिरुपती ग्रुपचे काम वाखाणण्याजोगे आहे. कारण या ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचा वाढदिवस असेल तो वाढदिवस केक कापून साजरा केला जात नाही. तर फळे कापून साजरा केला जातो. मागील वर्षभरापासून तिरुपती ग्रुपकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
मैत्रिणीनं दिली ती माहिती अन् सुरू झाला ध्येयवेडा प्रवास, छ. संभाजीनगरच्या लेकीला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
ग्रुपमधील ज्या सदस्याचा वाढदिवस आहे त्याचा फेटा व हार घालून सत्कार केला जातो. त्यानंतर केक न कापता वातावरणानुसार मिळणारे फळ जसे की सफरचंद, पेरू सिताफळ, कलिंगड यांसारखे फळ कापून हा वाढदिवस साजरा केला जातो. तसेच सर्व मित्रांच्या सोबतीने ते फळ खाल्ले जाते.
advertisement
याठिकाणी वाढदिवसावर कोणताही अवांतर खर्च केला जात नाही. जसे की फटाके वाजवले जात नाहीत किंवा कोणताही अनावश्यक खर्च केला जात नाही. अनेक तरुण मंडळांनी हा उपक्रम राबवला तर निश्चितच आरोग्यासाठी याचा फायदा होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील तिरुपती ग्रुपच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुकही केले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
धाराशिवच्या उमरगामधील तिरुपती ग्रुपचा अनोखा उपक्रम, वाढदिवसाला केक नाही कापत तर...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement