UPI Transaction : 2 हजारांच्या UPI ट्रांजॅक्शनवर 18% GST वसुल करणार सरकार? हे खरं आहे का? टॅक्स लागला तर काय होईल?

Last Updated:

एक मोठा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे, ज्याबद्दल सोशल मीडियावर चर्चेा सुरु आहे. तो म्हणजे "UPI ट्रान्झॅक्शनवरही आता GST लागणार का?"

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : आजकाल भाजीपाला असो, सोनं-चांदी असो, अगदी चहाच्या टपरीवरचं बिल असो… लोकांना सवयच लागली आहे, मोबाईल काढा, स्कॅन करा आणि पेमेंट डन. या ऑनलाइन प्रोसेसनं आयुष्य अगदी सोपं केलं आहे. ना पेसे सोबत ठेवण्याचं टेन्शन ना सुट्या पैशांचं टेन्शन. सगळं अगदी कॉन्टॅक्ट फ्री. हे सगळं सोपं झालंय ते UPI मुळे, आता कुणालाच ना कॅश ठेवायचं टेन्शन आहे, ना ATM च्या रांगेत उभं राहायची वेळ.
पण यासंबंधी एक मोठा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे, ज्याबद्दल सोशल मीडियावर चर्चेा सुरु आहे. तो म्हणजे "UPI ट्रान्झॅक्शनवरही आता GST लागणार का?"
मीडिया रिपोर्ट नुसार फक्त मार्च महिन्यातच 24.77 लाख कोटींचा UPI व्यवहार झाला आहे. म्हणजे जरा विचार करा एवढी मोठी रक्कम फक्त एका महिन्यात UPI वरून पाठवली गेली आहे. म्हणजे UPI आता आपल्या रोजच्या जीवनात इतकं महत्वाचं झालं आहे की काहीही विकत घ्यायचं झालं लगेचच स्कॅन करुन पैसे द्यायचे.
advertisement
पण जर या व्यवहारांवर 18% GST लागला, तर काय होईल? ही अफवा सध्या जोरदार व्हायरल होत आहे की 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या UPI व्यवहारांवर सरकार कर लावण्याच्या विचारात आहे.
GST खरंच लागणार? की फक्त अफवा आहे?
ET Now च्या रिपोर्टनुसार, सरकार सध्या अशा प्रस्तावाच्या तपासणीच्या प्रक्रियेत आहे. मात्र अजूनपर्यंत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
advertisement
MIRA Money चे सह-संस्थापक आनंद राठी यांचं म्हणणं आहे की, "UPI ट्रान्झॅक्शनवर थेट GST लावणं शक्य नाही. जर काही लागलं तर ते त्या प्लॅटफॉर्म्सच्या सर्व्हिस चार्ज वर लागू शकतं, जसं Google Pay, PhonePe, Paytm वगैरे."
जर खरंच GST लागला, तर काय होईल?
डिजिटल इंडिया मिशनला मोठा फटका बसेल. सामान्य लोक पुन्हा कॅशकडे वळतील.
advertisement
छोटे व्यापारी आणि दुकानदार अधिक अडचणीत येतील.
फिनटेक कंपन्यांवर मोठा आर्थिक दबाव येईल.
UPI व्यवहार बँक-टू-बँक होत असल्याने सध्या कोणताही अतिरिक्त चार्ज घेतला जात नाही. म्हणूनच त्याचा इतका वेगाने प्रचार आणि प्रसार झाला आहे.
आतापर्यंतची माहिती आणि तज्ज्ञांचं मत पाहता, सध्या ही एक अफवा असल्याचंच दिसतं. सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा होईपर्यंत घाबरण्याचं कारण नाही.
advertisement
जर भविष्यात UPI वर चार्जेस आले, तर तुमच्या आर्थिक सवयी बदलू शकतात. त्यामुळे ही बातमी महत्त्वाची आहे आणि अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या/Viral/
UPI Transaction : 2 हजारांच्या UPI ट्रांजॅक्शनवर 18% GST वसुल करणार सरकार? हे खरं आहे का? टॅक्स लागला तर काय होईल?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement