लाथ मारेल तिथे 'पैसे काढेन'; त्यानं ATM मशिनला मारलं आणि... Viral Video मुळे नवीन म्हण सोशल मीडियावर ट्रेंड

Last Updated:

या व्हिडिओमध्ये एक माणूस थेट ATM मशीनवर लाथ मारतो आणि जणू काही जादू झाल्याप्रमाणे नोटांचा पाऊस सुरू होतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना एक क्षणासाठी वाटतं हा तर देसी मनी हाइस्ट आहे.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक असाच जबरदस्त व्हायरल व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. आजच्या डिजिटल युगात काही ना काही विचित्र आणि हैराण करणाऱ्या घटना सतत व्हायरल होत असतात. मात्र, हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल आणि असं कधी आपल्यासोबत का होत नाही असा विचार देखील काही लोक करतील.
या व्हिडिओमध्ये एक माणूस थेट ATM मशीनवर लाथ मारतो आणि जणू काही जादू झाल्याप्रमाणे नोटांचा पाऊस सुरू होतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना एक क्षणासाठी वाटतं हा तर देसी मनी हाइस्ट आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ATM जवळ येते. कोणतं तरी कार्ड एटीएममध्ये टाकते आणि अचानकच जोरात लाथ मारते. त्यानंतर ATM मशीनमधून नोटा उडायला लागतात. रस्त्यावर साऱ्या नोटा विखुरल्या जातात. तो माणूस झपाट्याने त्या नोटा उचलायला लागतो. इतक्यात एका पोलिसाची नजर त्याच्यावर पडते आणि पोलिस त्याचा पाठलाग करतो. तो व्यक्ती शक्य तेवढ्या नोटा उचलून तिथून पळून जातो.
advertisement
हा व्हिडिओ X (पूर्वीचा Twitter) वर @HumansNoContext या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहीपर्यंत 9 मिलियनहून अधिक व्यूज आणि 45 हजार लाइक्स मिळाले आहेत. काहींनी हा स्क्रिप्टेड व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी म्हटलं की हा तर व्हायरल व्हिडिओसाठी केलेला स्टंट असावा.
advertisement
एका युजरने लिहिले "हे तर मनी हाइस्टचा देसी वर्जन वाटतंय", तर दुसऱ्याने कमेंट केली "अशी लॉटरी आम्हाला का नाही लागत?"
मराठी बातम्या/Viral/
लाथ मारेल तिथे 'पैसे काढेन'; त्यानं ATM मशिनला मारलं आणि... Viral Video मुळे नवीन म्हण सोशल मीडियावर ट्रेंड
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement