Desi Jugad : स्कूटीचा ब्रेक तुटला म्हणून व्यक्तीनं चालवलं डोक, लावला असा जुगाड तुम्ही विचार देखील केला नसावा, पाहा Video
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हा व्हिडीओ एका स्कूटी चालकाचा आहे आणि त्याच्या स्कूटीचा ब्रेक जेव्हा तुटला तेव्हा त्याने त्यासाठी असा काही जुगाड लावला की तुम्ही त्याचा स्वप्नात देखील विचार करु शकणार नाही.
मुंबई : काहीही म्हणा पण जुगाडच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीच धरु शकत नाही. भारतीय लोक आपल्या रोजच्या वापराच्या वस्तूंपासून ते अगदी महत्वाच्या गोष्टींपर्यंत सगळ्याच गोष्टींचा जुगाड करत असतात. यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असाच एका जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ एका स्कूटी चालकाचा आहे आणि त्याच्या स्कूटीचा ब्रेक जेव्हा तुटला तेव्हा त्याने त्यासाठी असा काही जुगाड लावला की तुम्ही त्याचा स्वप्नात देखील विचार करु शकणार नाही. त्यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच, चर्चेचा विषय बनला आहे.
नेमकं काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये एका स्कूटीचा ब्रेक तुटलेला दिसतो. पण, त्यावर त्याच्या चालकाने जुगाड केला, त्याने तुटलेल्या ब्रेकला दुरुस्त करण्याऐवजी तिथे टूथब्रशचा वापरला आहे. त्याने आधी ब्रशला वाकवलं आणि मग नंतर त्याने टेपने व्यवस्थित चिकटवलं आणि तयार झाला आगवा वेगळा ब्रेक.
advertisement
हा भन्नाट जुगाड बघून लोक कमेंट्समध्ये भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओ @jeejaji नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 'कुठली टेक्नोलॉजी आहे ही?' असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
advertisement
व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एक युजर म्हणतो, "हे भारत आहे, इथे काहीही होऊ शकतं!" तर दुसऱ्या युजरने लिहिलं, "हे बिहारचं असणार!"
हा जुगाड मस्करीपर्यंत ठिक आहे, पण स्कूटीसाठी असा प्रकार करणं जीव घेणं ठरु शकतं. ब्रेक हा गाडीचा महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यात असा हलगर्जीपणा करणे म्हणजे जीवाशी खिळणं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 29, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Desi Jugad : स्कूटीचा ब्रेक तुटला म्हणून व्यक्तीनं चालवलं डोक, लावला असा जुगाड तुम्ही विचार देखील केला नसावा, पाहा Video