ती सारखी झाडासोबत काढू लागली फोटो; म्हणाली माझा पहिला नवरा; तरुणीचा Video पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

Last Updated:

या व्हिडिओत एक तरुणी वारंवार एका झाडाला मिठी मारताना दिसते. पहिल्यांदा पाहणाऱ्यांना ती पर्यावरणप्रेमी असावी असं वाटतं, पण खरी गोष्ट कळल्यानंतर अनेकजण चकित झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात जे पाहून लोक थक्क होतात. पूर्वी जे काही रीतिरिवाज किंवा कृती लपूनछपून केल्या जायच्या, त्या आजच्या डिजिटल युगात खुलेआम केल्या जातात, तेही फक्त व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी. असाच एक मजेशीर आणि थोडा आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडिओत एक तरुणी वारंवार एका झाडाला मिठी मारताना दिसते. पहिल्यांदा पाहणाऱ्यांना ती पर्यावरणप्रेमी असावी असं वाटतं, पण खरी गोष्ट कळल्यानंतर अनेकजण चकित झाले आहेत. कारण ही तरुणी झाडाचं रक्षण करत नव्हती तर तिचं विवाह त्या झाडाशी लावण्यात आलं होतं आणि तो झाड तिचा पहिला नवरा आहे, ज्याच्यासोबत ती फोटो काढत आहे.
advertisement
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडिओतील मुलीचं नाव सिमरन चुग आहे. व्हिडिओ शेअर करताना सिमरनने लिहिलंय “हे माझ्या चांगल्या कर्मांचं फळ आहे”. व्हिडिओमध्ये तिने लिहिलंय की, “पहिल्या नवऱ्यासोबत प्री-वेडिंग फोटोशूट, कारण मी मागंलिक आहे”.
व्हिडिओत सिमरनने लाल ओढणी घेतली आहे आणि व्हिडीओत बॅकग्राउंडला शाहिद कपूरच्या ‘विवाह’ चित्रपटातील “दो अंजाने अजनबी” हे गाणं वाजतंय. व्हिडीओत तरुणी झाडाभोवती कधी लाजत, कधी हसते, कधी हाताने हार्ट बनवून फोटो काढते. तर कधी त्याला मीठी मारुन फोटो काढते. अगदी प्री-वेडिंग फोटोशूटसारखीच मजा ती घेताना दिसते. हा व्हिडिओ पाहून लोक हसतही आहेत आणि या विचित्र प्रथेबद्दल आश्चर्यही व्यक्त करत आहेत.
advertisement
सध्या हा व्हिडिओ लाखोवेळा पाहिला गेला आहे, 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्याला लाईक देखील केलं आहे आणि जवळपास 5 हजार कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी स्वतःचे अनुभवही शेअर केले आहेत.



 










View this post on Instagram























 

A post shared by Simran Chugh (@30_sim_ran)



advertisement
झाड किंवा प्राण्याशी लग्न का केलं जातं?
अनेकांना प्रश्न पडतो की मुलीचं झाड किंवा प्राण्याशी लग्न का लावलं जातं? ज्योतिषशास्त्रानुसार काही व्यक्तींमध्ये मांगलिक दोष असतो ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडथळे येऊ शकतात असं मानलं जातं. हा दोष कमी करण्यासाठी मुलीचं आधी झाडाशी लग्न लावलं जातं, ज्याला “वृक्ष विवाह” म्हणतात.
advertisement
या प्रक्रियेनंतर ती “विधवा” मानली जाते आणि नंतर तिचं पारंपरिक विवाहसोहळा सुरक्षितपणे होऊ शकतो असं ज्योतिष मानतात. काही वेळा मुलींचं लग्न प्राण्यांशीही लावलं जातं, यामागेही हेच कारण असतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
ती सारखी झाडासोबत काढू लागली फोटो; म्हणाली माझा पहिला नवरा; तरुणीचा Video पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement