'भीक मागण्याची पद्धत थोडी कॅज्युल आहे'; सिग्नलवर पैसे मागणाऱ्या व्यक्तीचा Video पाहून थांबणार नाही हसू
- Published by:Devika Shinde
Last Updated:
असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ इतका भन्नाट आहे की लोकांना तो खूपच आवडला आहे. आता तुम्हा हे ऐकून नक्कीच मनात आलं असेल की असं त्यात काय आहे?
मुंबई : आजकाल जरा एखादी गोष्टी थोडी हटके किंवा मजेदार वाटली तर लोक ती थेट सोशल मीडयावर शेअर करतात. अनेक लोक हे असे व्हिडीओ पाहून आपल्या मित्रांसोबत शेअर करतात, त्यावर लाईक किंवा कमेंट देखील केली जाते. अनेक लोक यावर आपलं मत देखील मांडतात. त्यामुळे फार कमी वेळेत एखादा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात ट्रेंड होऊ लागतो.
असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ इतका भन्नाट आहे की लोकांना तो खूपच आवडला आहे. आता तुम्हा हे ऐकून नक्कीच मनात आलं असेल की असं त्यात काय आहे?
खरंतर या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सिग्नलवर थांबलेल्या कारमधील व्यक्तीकडून भिक मागत आहे. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय ऐवढं? पण खरी गंमत्त तो भिकारी भिक मागताना जे बोलतो त्यात आहे.
advertisement
खरंतर एक व्यक्ती कारजवळ येते आणि हात जोडून कारमधील व्यक्तीला म्हणते, “हॅलो सर, गुड ईव्हनिंग... रागवू नका, शिव्या वैगरे देऊ ना. मी माझ्या पव्यासाठी (दारुसाठी) पैसे गोळा करतोय. श्रद्धा असेल तर 70 रुपयांचं एक आहे, जेवढं देता येईल ते द्या. नो प्रॉब्लेम सर!” हे सगळं ती व्यक्ती एकदम सभ्य आणि "ऑफिशियल" टोनमध्ये म्हणते. जे ऐकायला एकदम भारी वाटतंय. त्याच्या याच शैलीमुळे लोकांनी हा व्हिडीओ ट्रेंड केला आहे.
advertisement
Bheek mange ka tareeka thora causal hai 🫡😂 pic.twitter.com/b8Z8t0qRey
— 🎀🐥 (@meinkiakaruu) July 3, 2025
हा व्हिडीओ एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर @meinkiakaruu या हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय “भीक मागण्याची स्टाईल किती कॅज्युअल आहे ना?” खरं तर हा व्हिडीओ कुठला आहे हे स्पष्ट नाही, पण तो नेटकऱ्यांच्या हसण्याचं कारण मात्र नक्कीच ठरलाय. या व्हिडीओबद्दल असं ही सांगितलं जातंय की तो मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. पण व्हिडीओची पुष्टी न्यूज 18 मराठी करत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 05, 2025 7:43 PM IST
मराठी बातम्या/Viral/
'भीक मागण्याची पद्धत थोडी कॅज्युल आहे'; सिग्नलवर पैसे मागणाऱ्या व्यक्तीचा Video पाहून थांबणार नाही हसू