Viral News: रूमालाने तोंड लपवूनच खातात ही डिश; म्हणातात 'पाप की थाली'; कारण थक्क करेल

Last Updated:

तुम्हाला 'पाप की थाली' बद्दल माहिती आहे का? अशी डिश जी लोकांना तोंड लपवून खायला आवडते. ही परंपरा आजची नाही, अनेक दशकांची आहे.

तोंड लपवूनच खातात ही डिश
तोंड लपवूनच खातात ही डिश
मुंबई 07 डिसेंबर : जगात अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत. यातील काही पदार्थ विचित्र आहेत. काही ठिकाणी लोक सडलेलं पनीर खातात तर काही ठिकाणी कीटकांपासून बनवलेले पदार्थ खातात. काही ठिकाणी माशांचे डोळे खाणं खूप लोकप्रिय आहे तर काही ठिकाणी दगड फ्राय करून खाण्याची परंपरा आहे. पण तुम्हाला 'पाप की थाली' बद्दल माहिती आहे का? अशी डिश जी लोकांना तोंड लपवून खायला आवडते. ही परंपरा आजची नाही, अनेक दशकांची आहे. या मागचं कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
आम्ही फ्रान्सच्या परंपरेबद्दल बोलत आहोत. फ्रान्समध्ये Ortolan bunting नावाचा पक्षी आहे, ज्याच्यापासून बनलेली डिश लोक तोंड लपवून खातात. त्याला ‘पाप की थाली’ म्हणतात. असं मानलं जातं की लोक आपलं पाप देवापासून लपवण्याच्या उद्देशाने रुमालाने चेहरा झाकून हा पदार्थ खातात. ती एक परंपरा आहे. मात्र, आता या पक्ष्याचे मांस खाण्यावर युरोपातील अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. खुद्द फ्रान्सनेही त्यावर बंदी घातली आहे. पण तरीही अनेक ठिकाणी ते परंपरेच्या नावाखाली खाल्लं जातं.
advertisement
तुम्ही विचार करत असाल की लोक याला 'पाप की थाली' का म्हणतात? तर यामागे एक कथा आहे. हे पक्षी दर शरद ऋतूत आफ्रिकेत स्थलांतर करतात. तेव्हाच शिकारी त्यांना पकडतात. त्यांच्यावर खूप अत्याचार केले जातात. शिकारी त्यांना अनेक आठवडे पेटीत कैद करून ठेवतात. ते आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खातात ज्यामुळे त्यांचं वजन जास्त होतं. मग ते फुग्यासारखे फुगतात. नंतर ते आगीत भाजले जातात. अशी परंपरा आहे, की हा पूर्ण पक्षी एकाच वेळी खावा. जे याचं मांस खातात तेही ते क्रूरपणे खातात. यामुळेच कोणी पाहू नये म्हणून ते चेहरा लपवून खाण्याची परंपरा आहे.
advertisement
अनेक दशकांपूर्वी ही डिश उत्तर युरोपमधील श्रीमंत घरांच्या जेवणाच्या टेबलची शान असायची. रोमन सम्राटांपासून ते फ्रेंच राजांपर्यंत, ते शाही टेबलांवर सजवलं जायचं. राजघराण्यातील लोक हे पक्षी खाणं अभिमानाचे प्रतीक मानत. हे इतकं अनन्य होतं की ते परंपरेनं केवळ श्रीमंत आणि पादरी लोकांसाठीच उपलब्ध होतं. ऑर्टोलन लहान, तपकिरी आणि फिंचसारखे असतात. त्यांचं डोके हिरवट-तपकिरी असतं आणि त्यांचं शरीर चिमणीसारखं दिसतं. लांबी अंदाजे सहा इंच असते. पण त्यांच्यासोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral News: रूमालाने तोंड लपवूनच खातात ही डिश; म्हणातात 'पाप की थाली'; कारण थक्क करेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement