Weird Tradition : भारतात इथे मुलाची बहीणच बनते 'नवरदेव'; वहिनीला मंगळसूत्र घालून सोबत सात फेरेही घेते, वरमुलगा घरीच..
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
भारतातील एका भागात वर लग्नाच्या वेळी उपस्थित नसतो, तर त्याची बहीण तिच्या वहिनीसोबत लग्न करते आणि नंतर तिच्या भावासाठी पत्नी आणते.
नवी दिल्ली 06 डिसेंबर : भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. इथे काही अंतरावरच तुम्हाला वेगवेगळ्या आण् अनोख्या प्रथा, परंपरा पाहायला मिळतील, ज्या आश्चर्यकारक आहेत. लग्नाशी संबंधित अनेक अनोख्या परंपरा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. यापैकी एक गुजरातच्या काही गावांमध्ये आहे, जिथे लग्न नवरदेवाशिवायच होतात. होय, गुजरातच्या एका भागात वर लग्नाच्या वेळी उपस्थित नसतो, तर त्याची बहीण तिच्या वहिनीसोबत लग्न करते आणि नंतर तिच्या भावासाठी पत्नी आणते.
शी द पीपल वेबसाइटच्या अहवालानुसार, गुजरातमधील सुरखेडा, सनादा आणि अंबाल गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांमध्ये विवाहाची एक अतिशय अनोखी परंपरा पाळली जाते. या गावांतील विवाहांमध्ये वराला उपस्थित राहण्याची गरज नाही. तर, वराची अविवाहित बहीण किंवा कुटुंबातील कोणतीही अविवाहित स्त्री हा विवाह पार पाडते.
advertisement
हे आहे कारण -
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की अशा विश्वासामागे काय कारण आहे? खरं तर या तीन गावांचे एक कुलदेवता होते आणि ते अविवाहित होते. त्यांना आदर देण्यासाठी लग्नाच्या वेळी नवरदेवाला घरी ठेवलं जातं. कुलदेवताचा शाप वरावर पडू नये म्हणून हे केलं जातं. मुलगा नवरदेवाची वेषभूषा करतो. तो शेरवानी, पगडी घालतो, त्याची पारंपारिक तलवार हातात घेतो पण आपल्याच लग्नाला जात नाही.
advertisement

नवरदेवाची बहीणच सगळे विधी पार पाडते (फोटो: Twitter/@DESIblitz)
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, एका गावकऱ्याने यावर भाष्य करताना सांगितलं की, नवरदेव त्याच्या आईसोबत घरीच असतो आणि नवरदेवाची बहीण लग्नाची मिरवणूक घेऊन जाते. लग्न झाल्यावर बहीण वधूला घरी आणते. वराने करायचे सगळे विधी त्याची बहीण करते, मग ते मंगळसूत्र घालणं असो किंवा सात फेरे घेणं असो. ही परंपरा कोणी पाळली नाही तर त्यांचं काहीतरी वाईट होईल, असा समज या गावात आहे. लोक मानतात, की एखाद्याने परंपरा पाळली नाही तर लग्न लवकर तुटतं किंवा वैवाहिक जीवनात इतर अनेक समस्या निर्माण होतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2023 6:42 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Weird Tradition : भारतात इथे मुलाची बहीणच बनते 'नवरदेव'; वहिनीला मंगळसूत्र घालून सोबत सात फेरेही घेते, वरमुलगा घरीच..