कपडे आणायला गेली अन् बिबट्याशी गाठ पडली; महिलेच्या धाडसामुळे बिबट्या पिंजऱ्यात, वाचा शिराळ्यातील 'तो' थरार!

Last Updated:

शिराळा तालुक्यातील माळेवाडी गाव... सकाळची साधारण दहाची वेळ. अश्विनी गोसावी आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त होत्या. वाळलेले कपडे आणण्यासाठी...

Sanagli News
Sanagli News
कोकरूड : शिराळा तालुक्यातील माळेवाडी गाव... सकाळची साधारण दहाची वेळ. अश्विनी गोसावी आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त होत्या. वाळलेले कपडे आणण्यासाठी त्या घराच्या वरच्या मजल्यावरील अडगळीच्या खोलीकडे निघाल्या. दार उघडताच त्यांना आतमध्ये विचित्र आवाज आला. 'एखादं कुत्रं शिरलं असेल,' असा विचार करून त्यांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. पण आतून जो आवाज आला, तो गुरगुरण्याचा होता!
धाडस दाखवलं अन् दरवाजा केला बंद
क्षणात अश्विनी सावध झाल्या. त्यांनी निरखून पाहिलं, तर आत चक्क एक-दीड वर्षांची मादी बिबट्या बसली होती. काॅटखाली बसली होती. एका क्षणासाठी त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला, पण प्रचंड घाबरलेल्या असूनही त्यांनी हिंमत सोडली नाही. प्रसंगावधान दाखवत त्यांनी तात्काळ खोलीच्या दाराला बाहेरून कडी लावली आणि एका मोठ्या अनर्थ टळला.
advertisement
अन् सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला
त्यांनी तातडीने घरच्यांना आणि त्यानंतर ग्रामस्थांना सावध केले. काही वेळातच कोकरूड पोलीस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे पकडणे हे एक मोठे आव्हान होते. वनपाल अनिल वाजे आणि त्यांच्या टीमने खोलीच्या दाराजवळ एक पिंजरा लावला आणि बिबट्याला बाहेर येण्यासाठी खोलीच्या खिडकीतून हुसकावण्यास सुरुवात केली. पिंजरा लावल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
advertisement
त्यानंतर वनविभागाने बिबट्याला शिराळा येथील कार्यालयात नेले. तिथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली आणि तो पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. अश्विनी गोसावी यांच्या धाडसामुळे आणि समयसूचकतेमुळे हा बिबट्या जेरबंद झाला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
कपडे आणायला गेली अन् बिबट्याशी गाठ पडली; महिलेच्या धाडसामुळे बिबट्या पिंजऱ्यात, वाचा शिराळ्यातील 'तो' थरार!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement