कधी होणार पृथ्वीचा अंत? कोणी बाबा वैगरे नाही खुद्द NASA ने सांगितलं सत्य, रिसर्च ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Last Updated:

विज्ञानाच्या दुनियेतून आलेल्या एका अहवालानं मात्र जगाला हादरवलं आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी सुपरकंप्यूटरच्या मदतीनं केलेल्या गणनेतून असं स्पष्ट झालं आहे की एक दिवस असा येणार आहे, जेव्हा या पृथ्वीवर कोणतंही जीवसृष्टीचं अस्तित्व उरणार नाही.

AI POHOTO
AI POHOTO
मुंबई : आपण रोज जगतो, प्रवास करतो, हसतो, जगाच्या गजबजाटात रमतो, आपल्या नित्याची काम करतो. पण या सगळ्यात आपण हे नेहमी विसतो की आपण एका ग्रहावर रहातो जी निसर्गाने तयार केलेली आहे. पण जशी ही गोष्ट तयार झाली तसा त्याचा अंत ही कधी ना कधी होऊ शकतो. आपण ज्या पद्धतीने निसर्गाने दिलेल्या गोष्टी बनवत किंव तोडत चाललो आहे, त्यानुसार पृथ्वी कायमची अशीच राहील का? लाखो जीव, महासागर, झाडं, डोंगर... हे सगळं कायम असणार का? तर नाही
पण मग असंच सुरु राहिलं तर पृथ्वीचा अंत कधी होईल? विज्ञानाच्या दुनियेतून आलेल्या एका अहवालानं मात्र जगाला हादरवलं आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी सुपरकंप्यूटरच्या मदतीनं केलेल्या गणनेतून असं स्पष्ट झालं आहे की एक दिवस असा येणार आहे, जेव्हा या पृथ्वीवर कोणतंही जीवसृष्टीचं अस्तित्व उरणार नाही.
किती वर्षांनंतर संपेल पृथ्वीचं अस्तित्व?
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सूर्य दर अब्जावधी वर्षांनंतर अधिकाधिक तेजस्वी आणि तापलेला होत चाललाय. जेव्हा सूर्याचं हायड्रोजन इंधन संपतं, तेव्हा त्याची ऊर्जा उत्सर्जनक्षमता वाढते. यामुळे पृथ्वीवरील उष्णता असह्य होईल. वातावरणातील पाणी आणि आर्द्रता कमी होत जाईल, समुद्र कोरडे पडतील आणि अखेरीस पृथ्वी जळत्या खडकात रूपांतरित होईल.
advertisement
नासाच्या सुपरकंप्यूटर सिम्युलेशननुसार, सुमारे 1 अब्ज वर्षांनंतर (1,000,002,021) पृथ्वी राहण्यालायक उरणार नाही. त्या काळी सूर्याची उष्णता इतकी वाढेल की कोणत्याही सजीवासाठी इथे जगणं अशक्य होईल.
कमी होईल ऑक्सिजनचं प्रमाण
नासा आणि जपानमधील टोहो विद्यापीठातील संशोधकांनी या अंदाजासाठी अत्याधुनिक सुपरकंप्यूटर मॉडेलचा वापर केला. या मॉडेलमध्ये पृथ्वीचं वातावरण, सूर्याची ऊर्जा, हवामानातील बदल आणि ऑक्सिजनचं परिमाण अशा अनेक घटकांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून असं दिसलं की पुढील कोट्यवधी वर्षांमध्ये पृथ्वीवरील तापमान वाढतच जाईल आणि हळूहळू ऑक्सिजनचं प्रमाण इतकं कमी होईल की जीवसृष्टी टिकवणं अशक्य होईल.
advertisement
या तीव्र उष्णतेमुळे फक्त प्राणी-पक्षीच नाही, तर झाडं, वनस्पती आणि सूक्ष्म जीवसुद्धा नष्ट होतील. वैज्ञानिकांच्या मते, त्या काळी पृथ्वीवरील तापमान 100°C च्या वर जाईल.
सौर विकिरण आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे हवेतील श्वास घेणंही अशक्य होईल. मात्र हा अंत एका दिवसात होणार नाही. हा एक हळूहळू घडणारा प्रचंड बदल असेल. सूर्य आपल्या विकासाच्या अंतिम टप्प्यात रेड जायंट होईल आणि अखेरीस पृथ्वीला आपल्या कक्षेत सामावून घेईल. तेच पृथ्वीच्या अस्तित्वाचं शेवटचं पान ठरेल.
advertisement
जरी हा अंत अब्जो वर्षांनंतर घडणार असला, तरी नासाचा हा इशारा आपल्याला आजच जागं करतो. प्रदूषण, हवामानबदल आणि जंगलतोड हे संकट आपल्याला त्या शेवटच्या दिवसाजवळ आधीच नेऊ शकतात. म्हणूनच, पृथ्वीला वाचवण्याची सुरुवात आज आणि आत्ताच करणे गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
कधी होणार पृथ्वीचा अंत? कोणी बाबा वैगरे नाही खुद्द NASA ने सांगितलं सत्य, रिसर्च ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement