Airplane Fact : विमान उडवताना परफ्यूम्स का लावत नाहीत पायलट? यामागचं कारण ऐकाल तर म्हणाल, "अरे बापरे! असं पण असतं का?"
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हे नियम फक्त तांत्रिक बाबींवरच मर्यादित नसून, आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित गोष्टींनाही स्पर्श करतात. त्यापैकीच एक आश्चर्यकारक नियम म्हणजे पायलट्सनी विमानात बसताना परफ्युम वापरू नये.
मुंबई : आजच्या काळात विमान प्रवास हा जगभरातील सर्वात सुरक्षित आणि जलद वाहतूक प्रकार मानला जातो. मात्र, प्रवाशांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी पायलट्स आणि क्रू मेंबर्सवर अनेक कडक नियम लादलेले असतात. MPSCसारख्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनेही नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) चे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे नियम फक्त तांत्रिक बाबींवरच मर्यादित नसून, आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित गोष्टींनाही स्पर्श करतात. त्यापैकीच एक आश्चर्यकारक नियम म्हणजे पायलट्सनी विमानात बसताना परफ्युम वापरू नये.
हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी यामागे महत्त्वाचे कारण आहे. DGCA च्या मार्गदर्शनानुसार, भारतात प्रत्येक पायलटला उड्डाणापूर्वी ब्रेथलायझर टेस्ट द्यावी लागते. या चाचणीमुळे पायलटने अल्कोहोल घेतले आहे का नाही याची खात्री होते. पण समस्या अशी की, परफ्युम, माउथवॉश, हँड सॅनिटायझर यांसारख्या दैनंदिन उत्पादनांमध्ये एथिल अल्कोहोल असतो. त्यामुळे पायलटने दारू न घेतली असली तरी या उत्पादनांमुळे चुकीचा निकाल येऊ शकतो.
advertisement
अलीकडेच कॅप्टन अवधेश तोमर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत यामागील खरी कारणं सांगितली. त्यांनी स्पष्ट केलं की परफ्युम वापरणं आवडत असलं तरी त्यातील अल्कोहोलमुळे ब्रेथलायझरमध्ये चुकीची रीडिंग येऊ शकते.
हे डिव्हाइस इतकं संवेदनशील आहे की अगदी 0.0001% अल्कोहोलचीही नोंद करतं. परिणामी, पायलटने अल्कोहोल घेतलं नसतानाही तो दोषी ठरू शकतो, ज्यामुळे उड्डाण उशिरा होऊ शकतं आणि पायलटवर कारवाईही होऊ शकते.
advertisement
ऑक्टोबर 2023 मध्ये DGCA ने यासंदर्भात मसुदा जारी केला. यात स्पष्टपणे नमूद आहे की पायलट्स आणि क्रू मेंबर्सनी अल्कोहोलयुक्त परफ्युम, माउथवॉश, काही जेल्स किंवा औषधं यांचा वापर टाळावा. जर अशा औषधांचा वापर आवश्यक असेल, तर संबंधित कंपनीच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन परवानगी घेणे बंधनकारक आहे.
पायलट्सना परफ्युम लावू नये असा नियम जरी विचित्र वाटत असला तरी त्यामागे शास्त्रीय कारणं आहेत. अल्कोहोलयुक्त उत्पादनांमुळे ब्रेथलायझर चाचणीवर परिणाम होऊ शकतो आणि प्रवासाच्या सुरक्षिततेत अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच DGCA ने हा नियम कडकपणे लागू केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 7:17 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Airplane Fact : विमान उडवताना परफ्यूम्स का लावत नाहीत पायलट? यामागचं कारण ऐकाल तर म्हणाल, "अरे बापरे! असं पण असतं का?"