'या' देशात थम्सअप करणं समजलं जातं अश्लील, अंगठा दाखवल्यास होऊ शकतो तुरुंगवास

Last Updated:

अंगठा उंचावून दाखवणं म्हणजे थम्सअप करणे हे अत्यंत अपमानास्पद मानले जाते.

अंगठा उंचावून दाखवणं म्हणजे थम्सअप करणे हे अत्यंत अपमानास्पद मानले जाते.
अंगठा उंचावून दाखवणं म्हणजे थम्सअप करणे हे अत्यंत अपमानास्पद मानले जाते.
नवी दिल्ली :  इराणमध्ये हाताचा अंगठा उंचावून दाखवणं म्हणजे थम्सअप करणे हे अत्यंत अपमानास्पद मानले जाते. तिथे अंगठा दाखवणं मधलं बोट दाखवण्यासारखं अश्लील समजलं जातं.  फक्त इराणमध्येच नाही तर अनेक देशांमध्ये थम्सअपला अपमानास्पद मानतात. अंगठा वर करून इशारे करणं याचं मूळ प्राचीन पर्शियन संस्कृतीत आहे, तिथे याचा वापर अश्लील इशारा म्हणून केला जायचा.  एकही शब्द न बोलता अपमान व्यक्त करण्याची एक पद्धत असल्याचे प्राचीन पर्शियन संस्कृतीत समजले जाते.
तुम्ही कधी इराणला गेलात आणि तिथे सार्वजनिक ठिकाणी असं केलं तर स्थानिक लोक तुमच्यावर चिडू शकतात किंवा मारायला येऊ शकतात. तुमच्याविरोधात पोलीस तक्रार होऊ शकते आणि तुरुंगातही जावं लागू शकतं. कारण ही गोष्ट इथे खूप वाईट मानली जाते.
थम्सअप करणं पडेल महागात
इराणमध्ये थम्सअप केल्यास गैरसमज आणि वाद होऊ शकतात. जर तुम्ही इराणला जात असाल तर तिथल्या बोटांचे इशारे समजून घ्या, नाहीतर तिथे गेल्यावर असे करणे महागात पडू शकते.
advertisement
इराणमध्ये हाताने इशारे केले जात नाहीत
इराणमधील लोक सहसा हाताने इशारे करत नाहीत. असं करणे म्हणजे अपमानास्पद मानलं जातं. जगभरात, दोन मधल्या बोटांनी इंग्रजी व्ही अक्षरासारखं चिन्ह दाखवणं ‘व्हिक्ट्री’ म्हणजेच विजय किंवा शांतीशी जोडलं जातं, मात्र इथे तो अश्लील इशारा समजला जातो. तो अपमान म्हणून घेतला जातो. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे बोट दाखवून या इशारा करत असाल तर ते चांगलं मानलं जात नाही, हे आक्रमक आणि असभ्य आहे असं म्हणतात. तुम्ही व्यक्तिऐवजी वस्तूकडे बोटांनी इशारा करू शकता.
advertisement
डाव्या हाताचा वापर करणं अपमानास्पद
इराणसह अनेक मध्यपूर्व संस्कृतींमध्ये डाव्या हाताला अशुद्ध मानतात. एखादी वस्तू देण्यासाठी इथे डावा हात वापरणं अपमानास्पद मानलं जातं. यात हात मिळवण्याचाही समावेश आहे. जर एखाद्याने दुसऱ्या व्यक्तीशी डावा हात मिळवला तर तो समोरच्या व्यक्तीचा अपमान करत आहे, त्याला बेकार समजतोय किंवा त्याचा अपमान करतोय असं समजलं जातं.
advertisement
अफगाणिस्तानमध्येही थम्सअप आहे अश्लील
थम्सअप करणं इराणप्रमाणे अफगाणिस्तानातही अश्लील किंवा अपमानास्पद समजलं जातं. इटलीच्या काही भागांमध्ये, अंगठा दाखवणं असभ्य मानतात. मात्र ते इराण आणि अफगाणिस्तानइतकं अपमानास्पद नाही. ग्रीस आणि इराकमध्येही अंगठा दाखवणं अश्लील मानले जाते.
बोटं क्रॉस करणं
व्हिएतनाममध्ये बोटं क्रॉस करणं अश्लील समजतात. याची तुलना महिलांच्या जननेंद्रियाशी केली जाते. यामुळे ते अपमानास्पद मानलं जातं. मलेशियामध्ये तर्जनीने इशारे करणं असभ्य समजतात. त्याऐवजी अंगठा वापरलेला चालतो.
advertisement
फिलिपिन्समध्ये हात वर करून इशारा करणं अत्यंत आक्षेपार्ह मानले जाते, कारण तिथे प्राण्यांना बोलवण्यासाठी हातांनी इशारे केले जातात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
'या' देशात थम्सअप करणं समजलं जातं अश्लील, अंगठा दाखवल्यास होऊ शकतो तुरुंगवास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement