भारतात इथं आहे Wife Market! जिथं भाजीसारखी 'बायको' मिळते; खरेदीला दूरदूरहून येतात लोक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wife market : एक अशी जागा आहे जिथं महिलांचा बाजार भरतो. इथं आल्यानंतर पुरुष आपल्या आवडीच्या स्त्रीला पत्नी म्हणून घेतात किंवा भाड्याने घेऊन आपल्या घरी जातात.
भोपाळ : कपडे, भाजी, फळं, फुलं आजवर तुम्ही अशा मार्केट मध्ये गेला असाल. पण तुम्ही वाइफ मार्केट बाबत कधी ऐकलं आहे का? तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल की असं विचित्र मार्केट चक्क भारतात आहे. जिथं लोक भाज्यांसारखी पत्नी खरेदी करायला येतात.
भारतात अनेक प्रकारच्या जमाती राहतात. त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या परंपरा आहेत. काही प्रथा चांगल्या तर काही वाईट आहेत. ज्या देशात महिलांना देवी म्हणून पूजलं जातं, तिथं महिलांचा बाजार भरवला जातो. या बाजारात इतर बाजारांप्रमाणेच महिलांची खरेदी-विक्री केली जाते.
बायको विकत घेण्यासाठी करार
बाजारात आणलेल्या महिलेसाठी करार केला जातो. त्यासाठी स्टॅम्प पेपरही बनवले जातात. हे स्टॅम्प पेपर फक्त 10 रुपयांपासून सुरू होतात. याशिवाय बाजारात महिलांची किंमत पंधरा हजार रुपयांपासून सुरू होते. ही किंमत लाखांपर्यंत जाऊ शकते. कुमारी मुलींची किंमत जास्त आहे.
advertisement
लोक या बाजारात येतात आणि करारानुसार महिलांना भाड्याने घेतात. करारामध्ये भाड्याचा कालावधीही ठरवला जातो. एका वर्षासाठी किंवा काही महिन्यांसाठी त्यांना सोबत नेलं जातं. इथं दूरदूरहून पुरुष येतात. जे आपल्या आवडीची मुलगी किंवा स्त्री पाहून तिची किंमत ठरवतात आणि मग तिला घेऊन जातात.
advertisement
का खरेदी करतात 'बायको'?
गरीब कुटुंबातील लोक आपल्या कुटुंबातील महिलांना या बाजारात आणतात. पुरुष आपल्या आवडीच्या स्त्रीची किंमत ठरवतात आणि तिला सोबत घेतात. कोणी आपल्या घरातील वडिलधाऱ्यांची सेवा करण्यासाठी, काही ज्यांचे लग्न होऊ शकत नाही, ते काही काळासाठी येथून बायको विकत घेतात. मात्र, महिलेला करार नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे.
कुठे भरतो हा बाजार
भारतात असा विचित्र बाजार कुठे भरतो हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. मध्य प्रदेशातील शिवपुरीत असा बाजार भरतो. जिथं लोक भाड्याने इतर लोकांच्या मुली विकत घेतात. या प्रथेला 'धडीचा' असं म्हणतात. यासाठी नियमित बाजारपेठ आहे. इथं दूरदूरहून पुरुष येतात. जे आपल्या आवडीची मुलगी किंवा स्त्री पाहून तिची किंमत ठरवतात आणि मग तिला घेऊन जातात.
Location :
Madhya Pradesh
First Published :
September 13, 2024 10:53 AM IST
मराठी बातम्या/Viral/
भारतात इथं आहे Wife Market! जिथं भाजीसारखी 'बायको' मिळते; खरेदीला दूरदूरहून येतात लोक