बुटाचा 'पायगुण'! फक्त 1300 रुपयांचे बूट घरी आणले आणि लागली तब्बल 13 लाखांची 'लॉटरी'

Last Updated:

Branded shoes at cheaper price : एका महिलेने रेडिटवर तिचा खरेदीचा अनुभव शेअर केला आहे. महिलेने सांगितलं, "मी हे बूट मला छान वाटले म्हणून मी खरेदी केले. नंतर मला कळलं की...

News18
News18
नवी दिल्ली : कधीकधी नशीब पलटते आणि साधी खरेदी देखील जॅकपॉटमध्ये बदलू शकते. एका महिलेसोबत असंच घडलं जिने एका जुन्या दुकानातून फक्त 17.99 डॉलर्स म्हणजे सुमारे 1350 रुपयांत काळे लेदर बूट खरेदी केले पण खरंतर ते बूट प्रसिद्ध डिझायनर ब्रँड ख्रिश्चन लुबाउटिनचे तब्बल एक लाख रुपये किमतीचे ब्रँडेड बूट निघाले.
एका महिलेने रेडिटवर तिचा खरेदीचा अनुभव शेअर केला आहे. महिलेने सांगितलं, "मी हे बूट मला छान वाटले म्हणून मी खरेदी केले. नंतर मला कळलं की त्याचं लेदरही चांगल्या क्वालिटीचं होतं. जेव्हा मी ब्रँडचं नाव पाहिलं तेव्हा मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता."
तिने त्या बुटाचे फोटो आणि किंमतही शेअर केली आहे. ख्रिश्चन लूबाउटिनचे एन हायवर लग लो नावाचे हे बूट. ब्रँडच्या वेबसाइटवर त्याची किंमत जवळपास 1.3 लाख रुपये आहे.
advertisement
हा फ्रेंच लक्झरी ब्रँड 1990 च्या दशकात त्याच्या हाय हिल्सच्या स्टिलेटोसाठी जगभरात प्रसिद्ध झाला. त्याची खासियत अशी आहे की प्रत्येक बूट हाताने बनवलेला असतो आणि त्याचा सोल चमकदार लाल रंगाचा असतो. या बूटांच्या सोलवरील लाल सोल हा ख्रिश्चन लूबाउटिन ब्रँडचा एक महत्त्वाचा भाग आहे.
advertisement
महिलेने लिहिलं, "हे अस्सल लूबाउटिन आहेत आणि फक्त 17 डॉलर्समध्ये! मी कधीच विचार केला नव्हता की मी इतका मोठा शोध लावेन. "
advertisement
अनेकांना कपडे आणि बूट खरेदी करायला आवडतात, पण सर्वांनाच महागडे ब्रँड परवडत नाहीत. अनेकांना नवीन वस्तूही परवडत नाहीत, म्हणून ते सेकंड-हँड वस्तू घेतात. या महिलेनेही तेच केलं. तिने एका सेकंड-हँड दुकानातून हे बूट खरेदी केले. पण जेव्हा तिने कंपनी पाहिली तेव्हा ती थक्क झाली. आपल्याला जॅकपॉटच लागला असं तिला वाटलं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बुटाचा 'पायगुण'! फक्त 1300 रुपयांचे बूट घरी आणले आणि लागली तब्बल 13 लाखांची 'लॉटरी'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement