काय सांगता! फक्त 30 सेकंदाचं काम आणि महिला कमावते 70 लाख, करते काय?

Last Updated:

Weird Business : महिला म्हणते, एवढी साधी गोष्ट माझ्या यशाचा इतका मोठा भाग बनली आहे हा विचार करूनच आश्चर्य वाटतं. मी कधीच विचार केला नव्हता की माझा उच्चार इतका मौल्यवान होईल. 

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : झटपट पैसे मिळावेत असं कुणाला वाटत नाही. यासाठी काही लोक बचत करतात, तर काही कितीतरी ठिकाणी पैसे लावतात आणि आपलं नशीब आजमावतात. पण फक्त 30 सेकंदाचं काम करून कुणाला महिन्याला 70 लाख रुपये मिळतात असं सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल. किंबहुना यावर विश्वासच बसणार नाही. पण एक महिला ते करते आहे.
अमेरिकेत राहणारी ही 42 वर्षांची महिला. हॉली जेन असं तिचं नाव आहे. हॉली  कोणत्याही मोठ्या व्यवसायातून किंवा नोकरीतून नाही तर तिच्या फोनवर 30 सेकंदांचे व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवून भरपूर पैसे कमवत आहे. तिचा टेक्सन उच्चारण तिच्या ब्रिटिश चाहत्यांमध्ये इतका लोकप्रिय झाला आहे की आता तिचा आवाज तिच्यासाठी सर्वात मोठा व्यवसाय बनला आहे.
advertisement
न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, ही महिला एका सामान्य अमेरिकन व्यक्तीच्या स्टिरियोटाइपशी संबंधित आहे, ती काही प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर आहे. हॉलीने तिच्या मृदू टेक्सन उच्चारांना एक लोकप्रिय बिझनेस बनवलं आहे. हॉलीचे इन्स्टाग्रामवर 1.6 दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॉली फक्त व्हॉइस नोट्स रेकॉर्ड करून दरमहा सुमारे 20 हजार डॉलर्स म्हणजे सुमारे 17 लाख रुपये कमावते. याशिवाय तिचं सरासरी मासिक उत्पन्न सुमारे 80000 डॉलर्स म्हणजे 70 लाख रुपयेपर्यंत पोहोचतं.
advertisement
एक लहान अभिवादन जसं की गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट 20 डॉलर्स म्हणजे 1700 रुपये आणि वैयक्तिकृत, आक्षेपार्ह आवाज असलेल्या व्हॉइस नोट्स 100 डॉलर्सपर्यंत आहेत. ती एका वेळी मोबाईलवर 30 सेकंद बोलून शेकडो डॉलर्स कमावते. तिला दररोज 6 ते 8 व्हॉइस नोट रिक्वेस्ट मिळतात.
advertisement
हॉली म्हणते, लोक मला कमी लेखतात, पण हे माझ्यासाठी फायदेशीर ठरतं. आता माझा आवाजच सर्व खर्च भागवतो आणि त्याहूनही अधिक म्हणजे एवढी साधी गोष्ट माझ्या यशाचा इतका मोठा भाग बनली आहे हा विचार करूनच आश्चर्य वाटतं. मी कधीच विचार केला नव्हता की माझा उच्चार इतका मौल्यवान होईल.  मी कधीच कल्पना केली नव्हती की ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पुरुषांना माझा आवाज इतका आवडतो.
मराठी बातम्या/Viral/
काय सांगता! फक्त 30 सेकंदाचं काम आणि महिला कमावते 70 लाख, करते काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement