हेअर ड्रायर वापरल्याने हॉटेलनं आकारलं लाखाचं दंड, महिलेसोबत घडला भलताच प्रकार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एका महिलेने केसांची स्टाईल सेट करण्यासाठी हेअर ड्रायर वापरल्यामुळे तिला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
मुंबई, 19 डिसेंबर : हॉटेलमधील रुममध्ये दिलेल्या गोष्टी या आपल्या वापरासाठीच असतात. म्हणून आपण त्याचा सरास वापर करतो. मग तो टॉवेल असोत, साबण असोत किंवा हँगर्स. आपण ते वापरतो. परंतू आपल्या रुममधील एक वस्तू वापरल्यामुळे एका महिलेला लाखोंचं बिल आलं. जे फारच धक्कादायक आहे.
ही घटना ऑस्ट्रेलियामधली आहे. जिथे एका महिलेने केसांची स्टाईल सेट करण्यासाठी हेअर ड्रायर वापरल्यामुळे तिला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
केली (महिलेचं नाव बदलले आहे) ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे एका कॉन्सर्टसाठी गेली होती. तिथे त्यांनी ‘नोवोटेल पर्थ लँगली’ नावाची हॉटेलची खोली घेतली. केलीने तिचे हेअर ड्रायर स्विच बोर्डमध्ये लावताच, हॉटेलमध्ये फायर अलार्म वाजू लागला आणि लगेचच अग्निशमन दलाची टीम तिच्या खोलीत पोहोचली. मात्र, आग लागली नसल्याने पथक तातडीने परतले.
advertisement
कॅलीने दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून चेक आउट केले. त्यानंतर हॉटेलने तिच्या खात्यातून सुमारे एक लाख दहा हजार रुपये कापल्याचे तिने पाहिले. जेव्हा तिने हॉटेलशी बिलाच्या रकमेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला सांगितले की तिने हेअर ड्रायर वापरताना फायर अलार्म वाजल्यानं दंड म्हणून ही रक्कम कापण्यात आली आहे.
केलीच्या मते, हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे $240 (अंदाजे रु. 16,000) होते. तथापि, आपत्कालीन आणि फायर अलार्मची अनावश्यक रिंगिंगमुळे, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाने केलीला 1337 डॉलर्सचा दंड ठोठावला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे यानंतरही हॉटेलने तिच्या खात्यातून 63 डॉलर (सुमारे 5200 रुपये) जास्त घेतले होते.
advertisement
नियम काय आहेत?
'पर्थ नाऊ न्यूज'नुसार, खोट्या किंवा मुद्दाम केलेल्या अलार्मसाठीचा दंड 2015 मध्ये लागू करण्यात आला होता, कारण 'अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभाग'ला खोट्या फायर अलार्ममुळे सुमारे 80 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. मालमत्तेच्या पहिल्या तीन खोट्या फायर अलार्मसाठी कोणताही दंड नसला तरी, मालमत्ता मालकाला वर्षातील चौथ्या खोट्या अलार्मसाठी दंड भरावा लागतो. हे केलीच्या बाबतीत घडल्याप्रमाणे हॉटेल मालक ग्राहकांकडून दंड वसूल करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2023 9:07 AM IST









