एका कॅनमध्येच 'गार', जगातली सर्वात स्ट्राँग बियर, किती आहे किंमत?
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
एक बीअर आहे, जी प्यायल्यानंतर माणसाला रुग्णालयात नेण्याची वेळ येऊ शकते. ही जगातली सर्वांत स्ट्राँग बीअर असल्याचं म्हटलं जातं.
मुंबई : मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्ती संपूर्ण जगात आहेत. पिणारा प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार ब्रँड निवडतो. काहींना बीअर आवडते, काहींना मद्याचे इतर प्रकार आवडतात. बीअर पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कारण त्यात अल्कोहोलचं प्रमाण खूप कमी असतं. काही बीअर ब्रँड असेही आहेत, जे स्ट्राँग बीअर बनवतात. अशीच एक बीअर आहे, जी प्यायल्यानंतर माणसाला रुग्णालयात नेण्याची वेळ येऊ शकते. ही जगातली सर्वांत स्ट्राँग बीअर असल्याचं म्हटलं जातं.
सर्वांत स्ट्राँग बीअरचं नाव
जगातल्या सर्वांत स्ट्राँग बीअरचं नाव स्नेक व्हेनम असं आहे. BREWMEISTER नावाची कंपनी ही बीअर बनवते. या बीअरची बाटली पाहून अंदाज येईल, की त्यामुळे किती नशा होईल. त्यात अल्कोहोलचं प्रमाण 67.5 टक्के आहे. जगातल्या कोणत्याही बीअरमध्ये अल्कोहोलचं इतकं प्रमाण आढळत नाही. काही देशांमध्ये, बीअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असण्यास बंदी आहे.
advertisement
कुठे बनते ही बीअर
जगातली सर्वांत स्ट्राँग बीअर ब्रिटनची आहे. ती खूप स्ट्राँग असल्याने जास्त जण ती पीत नाहीत; पण काही जण ही बीअर केवळ नशा असल्याने पितात. ही बीअर बनवण्यासाठी स्मोक्ड पीट माल्ट आणि शॅम्पेन यीस्टसारख्या गोष्टींचा वापर केल्याचा कंपनीचा दावा आहे. याशिवाय त्यात एली यीस्टही मिसळलं जातं.
सर्वांत स्ट्राँग बीअरची किंमत
साधारणपणे 330 मिली बीअरच्या बाटलीची किंमत 200 ते 300 रुपये असते; पण जगातली सर्वांत स्ट्राँग बीअर घ्यायची असेल तर जास्त पैसे मोजावे लागू शकतात. स्नेक व्हेनम या बीअरच्या 330 मिली बाटलीची किंमत 40 पौंड म्हणजेच 4 हजार रुपये आहे.
advertisement
सर्वांत स्ट्राँग बीअर प्यायल्यास काय होतं?
एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे, की ही बीअर पहिल्यांदाच पीत असाल तर सोबत कुणी तरी असू द्या. कारण ही बीअर प्यायल्यानंतर प्रकृती बिघडू शकते. हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरजही भासू शकते. ही बीअर प्यायल्यानंतर उलट्या होऊ शकतात. याशिवाय पोटाचा त्रास होऊ शकतो. या बीअरचा हँगओव्हरही खूप होतो. ही प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशीही डोकं जड राहू शकतं आणि दुखू शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2024 8:54 AM IST








