भल्यामोठ्या अजगराला तरुण रस्त्यावर ओढतोय, कुत्र्यानं पाठलाग केला आणि...काय घडलं पाहा Video
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
साप, नाग, अजगर, कोब्रा हे एकापेक्षा एक भयानक आणि विषारी प्राणी आहेत. त्यांच्या हल्ल्यात वाचणं खूप कठिण आहे.
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : साप, नाग, अजगर, कोब्रा हे एकापेक्षा एक भयानक आणि विषारी प्राणी आहेत. त्यांच्या हल्ल्यात वाचणं खूप कठिण आहे. त्यामुळे यांचं नाव ऐकलं तरी अनेकांचा थरकाप उडतो पाहिल्यावर तर काय अवस्था होईल याचा अंदाजच लावू शकत नाही. अशातच काही लोक या प्राण्यांना त्रास देतात किंवा त्यांच्याशी पंगा घेताना दिसतात. एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तरुण अजगराला ओढत आहे. हे दृश्य पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
तरुणा अजगराला रस्त्यावर फरपटत ओढत नेत आहे. तेवढ्यात एक कुत्रा त्याला हे करण्यापासून रोखतो. मग कुत्र्याला थांबवण्यासाठी दुसरा तरुण येतो आणि त्याला लाथेनं मारतो. मात्र कुत्रा काही अजगराला सोडत नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
व्हायरल व्हिडिओमध्ये ओल्या रस्त्यावर एक तरुण अजगराला एका हाताने पकडून ओढताना दिसत आहे. त्याच्या पाठीमागे आणखी काही तरुणही चालत आहेत आणि आजूबाजूला उभे असलेले लोक त्याच्याकडे बघत आहेत. पण अचानक एक कुत्रा तिथे येतो आणि तो अजगराला तोंडाने पकडतो. तो गुरगुरतो आणि त्या अजगराला चावू लागतो. त्यामुळे तेथे उपस्थित असलेले काही लोक त्याला काठीने मारहाण करतात. मग कुत्रा अजगराला सोडतो. हे दृश्य खूपच आश्चर्यचकित करणारं आहे.
advertisement
advertisement
Earth Reels नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेक कमेंट व्हिडीओवर येताना दिसत आहे. अनेकजणांनी हे प्राण्यासोबत करणं चुकीचं असल्याचं म्हटलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2023 11:17 AM IST
मराठी बातम्या/Viral/
भल्यामोठ्या अजगराला तरुण रस्त्यावर ओढतोय, कुत्र्यानं पाठलाग केला आणि...काय घडलं पाहा Video


