Panipuri Lover: तरुणानं पाणीपुरीमध्ये टाकले असे पदार्थ, पाहून लोक म्हणाले, हा काय विचित्र प्रकार!

Last Updated:

जगभरात फूडी लोकांची काही कमतरता नाही. आजकाल तर स्ट्रीट फूड लव्हर खूप असून बाहेरचं खायला लोकांना खूप आवडतं. त्यामुळे लोक सतत काही ना काही नवं फूड ट्राय करताना दिसतात.

तरुणानं पाणीपुरीमध्ये टाकले
तरुणानं पाणीपुरीमध्ये टाकले
नवी दिल्ली : जगभरात फूडी लोकांची काही कमतरता नाही. आजकाल तर स्ट्रीट फूड लव्हर खूप असून बाहेरचं खायला लोकांना खूप आवडतं. त्यामुळे लोक सतत काही ना काही नवं फूड ट्राय करताना दिसतात. त्यामुळे विक्रेत्यांचीही मजा असून तेही नवनवे पदार्थ मार्केटमध्ये आणतात आणि ग्राहकांचं लक्ष वेधतात. सोशल मीडियावर अशा फुड फ्युजनचे तर अनेक व्हिडीओ पहायला मिळतात. अशातच पाणीपुरीचा एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये एक तरुण वेगवेगळ्या प्रकारची पाणीपुरी विकतोय. अशी पाणीपुरी तुम्ही कदाचितच खाल्ली असेल.
पाणीपुरी भरपूर लोकांना आवडते. पाणीपुरीची क्रेझ जसजशी वाढत आहे तसतशी पाणीपुरीमध्ये नवनवे प्रकार येत आहेत. विक्रेते पाणीपुरीमध्ये अपग्रेड करत असून वेगवेगळे पदार्थ टाकून पाणीपुरी बनवत आहेत. अशातच एका तरुणानं चक्क वेगवेगळी फळं टाकून पाणी पुरी बनवली. या निराळ्या फ्लेवरची पाणीपुरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.
advertisement
तुम्ही आत्तापर्यंत वाटाणा, बटाट्याची पाणीपरी खाल्ली असेल मात्र एका तरुणानं ड्रॅगन फ्रुट, सफरचंद आणि नाशपती टाकून पाणीपुरी बनवलीय. या हटके पाणीपुरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
advertisement
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुण पाणीपुरी विक्रेता सफरचंद, ड्रॅगन फ्रुट, नाशपती कट करतो. मग सगळी फळं मिक्स करुन तो पाणीपुरीमध्ये भरतो आणि त्यावर वेगवेगळ्या फ्लेवरचं दही टाकतो. त्याच्या स्टॉलवर लिहिलंय की, 6 प्रकारच्या पाणीपुरी मिळतात.
हा व्हायरल व्हिडीओ जयपूरचा असल्याचं म्हटलं जातंय. जयपूरमध्ये या तरुणानं हे पाणीपुरी स्टॉल ओपन केलं आहे. या तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवत आहे. jaipurhunger_stories नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असून काहींना याला चांगला प्रतिसाद दिला आहे तर काहींनी याला विचित्र म्हटलंय.
मराठी बातम्या/Viral/
Panipuri Lover: तरुणानं पाणीपुरीमध्ये टाकले असे पदार्थ, पाहून लोक म्हणाले, हा काय विचित्र प्रकार!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement