advertisement

Stunt Video : भरधाव स्पीडने बाईक चालवत होता तरुण, पुढच्याच क्षणी घडलं थरारक

Last Updated:

दिवसभरात जगात अनेक अपघात घडतात. लोकांच्या निष्काळजीपणामुळे, भरधाव वेगामुळे हे अपघात घडत असतात.

 भरधाव स्पीडने बाईक चालवत होता तरुण
भरधाव स्पीडने बाईक चालवत होता तरुण
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : दिवसभरात जगात अनेक अपघात घडतात. लोकांच्या निष्काळजीपणामुळे, भरधाव वेगामुळे हे अपघात घडत असतात. काही तरुण रस्त्यावर स्टंटबाजी करताना दिसतात ज्यामुळे समोरच्याची चुकी नसली तरी त्यांना अशा अपघातांचा सामना करावा लागतो. अशा स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये तरुण भरधाव वेगाने बाईक चालवत आहे मात्र पुढे त्याच्यासोबत भयानक घडतं.
एक तरुण रस्त्यावर भरधाव वेगाने बाईक चालवत होता. काही वेळातच समोरुन येणाऱ्या कारसोबत त्याची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, पाहूनच अंगावर काटा येईल. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या अपघाताच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही बाईकस्वार भरधाव स्पीडने गाडी चालवत आहे. त्यांचा युट्युब चॅनल असून यावर त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. Street Demon PC असं त्यांच्या चॅनेलचं नाव आहे. बाईकस्वार भरधाव स्पीडने गाडी चालवत असून बाकी वाहनांना ओव्हरटेक करत आहे. बाईक एवढ्या स्पीडने आहे की गाड्याही नीट दिसत नाहीत. अचानक बाईकची समोरुन येणाऱ्या कारसोबत धडक होते. हा अपघात एवढा भीषण आहे की, पाहून तुमचाही थरकाप उडेल.
advertisement
समोर आलेला हा 4.5 मिनिटांचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. अपघात झालेल्या व्यक्तीचा युट्युब चॅनेल असून त्यावर तो विविध स्टंट केलेले व्हिडीओ शेअर करत असतो.
advertisement
दरम्यान, सोशल मीडियावर असे स्टंट व्हिडीओ कायमत समोर येत असतात. मात्र बऱ्याचदा असे स्टंट करणं लोकांना महागात पडतं. ही स्टंटबाजी त्यांच्याच जीवावर येते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Stunt Video : भरधाव स्पीडने बाईक चालवत होता तरुण, पुढच्याच क्षणी घडलं थरारक
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement