advertisement

कृषी हवामान : 'डिटवाह' चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवलं! या भागांत पाऊस बरसणार, काय काळजी घ्याल?

Last Updated:

Maharashtra Weather Update : ‘डिटवाह’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यभर हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ राहिले असून अचानक गारठाही वाढला आहे.

maharashtra weather update
maharashtra weather update
मुंबई : ‘डिटवाह’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यभर हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ राहिले असून अचानक गारठाही वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा पुन्हा एकदा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (30 नोव्हेंबर) राज्यातील अनेक भागांत आकाश ढगाळ राहणार असून विशेषत: विदर्भातील काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
advertisement
पहाटे धुक्याची चादर
शनिवार (29 नोव्हेंबर) पहाटे राज्यातील मोठ्या भागात घनदाट धुके पसरलेले दिसले. या धुक्यामुळे वातावरणात गारवा वाढला आणि थंडीची तीव्रता जाणवू लागली. तापमानातील अचानक घट राज्यातील नागरिकांना हुडहुडी भरवणारी ठरली.
मराठवाड्यातील परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सर्वात नीचांकी 8.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तसेच जेऊर येथे किमान तापमान 9 अंश सेल्सिअस, धुळे कृषी महाविद्यालयात 9.1 अंश सेल्सिअस, तर भंडाऱ्यात 10 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. या सर्व ठिकाणच्या तापमानात झालेल्या घसरणीमुळे हिवाळ्याची चाहूल अधिक तीव्रपणे जाणवत आहे.
advertisement
कमाल तापमानात चढ-उतार कायम
राज्यात दिवसा कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच आहेत. कोकणातील रत्नागिरी येथे 33.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले आहे. रात्रीचे तापमान कमी आणि दिवसाचे तापमान काहीठिकाणी जास्त असल्याने तापमानातील तफावत वाढत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही दिसत आहे. सर्दी, खोकला आणि तापाच्या तक्रारी वाढत असल्याने आरोग्य विभागाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
चक्रीवादळाचा ढगाळ वातावरणावर परिणाम
‘डिटवाह’ चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवत आहे. त्यामुळे राज्यभर ढगाळ वातावरण कायम राहिले असून, सूर्यप्रकाशात लक्षणीय घट दिसून येते आहे. हवामान विभागानुसार अरबी समुद्रातील हवामान बदलांचा थेट परिणाम पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जाणवतो आहे. यामुळे रात्री थंडी अधिक तर दिवसा दमट वातावरण अशी स्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
विदर्भात हलक्या पावसाची शक्यता
आज (30 नोव्हेंबर) हवामान विभागाने विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान स्थिर नसून पुढील दोन दिवस किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : 'डिटवाह' चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवलं! या भागांत पाऊस बरसणार, काय काळजी घ्याल?
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement