दु:खद! छ. संभाजीनगरमध्ये मक्याची टाकी फुटली, मक्याखाली दाबून 4 जणांचा मृत्यू

Last Updated:

Maize Tank Burst : छत्रपती संभाजीनगर मधील शेंद्रा एमआयडीसीमध्ये मक्याची टाकी फुटल्याची घटना शुक्रवारी( 15 नोव्हेंबर) रोजी घडली आहे. यामध्ये मक्याखाली दाबून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मद्यनिर्मिती कारखान्यात ही घटना घडली आहे.

छ. संभाजीनगरमध्ये मक्याची टाकी फुटली
छ. संभाजीनगरमध्ये मक्याची टाकी फुटली
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधील शेंद्रा एमआयडीसीमध्ये मक्याची टाकी फुटल्याची घटना शुक्रवारी( 15 नोव्हेंबर) रोजी घडली आहे. यामध्ये मक्याखाली दाबून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मद्यनिर्मिती कारखान्यात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर टाकीमध्ये 3 हजार टन इतकी मका होती. मात्र अचानक टाकी फुटल्याने आजूबाजूच्या परिसरात काम करणारे चार मजूर हे मक्याखाली दाबले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र घटनेत त्यांचा मृत्यू झाला. किसन हिरडे (50), विजय गवळी ( 40) दत्तात्रय बोरडे (40) असे मृत व्यक्तींचे नावे असून एका मृत व्यक्तीची ओळख न पटल्याची माहीती आहे. तर प्रशांत सोनवणे, प्रसाद काकड, वाल्मीक शेळके नावाच्या व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
रॅडिको एन. व्ही. डिसलरीज या मद्य कंपनीमध्ये ही घटना घडली आहे. ही मद्य कंपनी 2008 पासून कार्यरत आहे. कंपनीच्या स्टोअर भागामध्ये 3 हजार टन इतकी मका होती. पत्र्याच्या कोठारामध्ये ही मका साठवून ठेवण्यात आली होती. या टाकीला काही दिवसांपासून गळती लागली होती. ही गळती थांबवण्यासाठी पिडीत लोक हे टाकीची दुरुस्ती करत होते. मात्र अचानक टाकी फुटली आणि ढिगाऱ्याखाली अडकून 4 जणांचा मृत्यू झाला.
advertisement
कामगार, नातेवाईकांचे आंदोलन
या घटनेवरून कामगारांचे नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरू केले आहे. कंपनीच्या विरोधात घोषणा देत कंपनीवर आरोप केला आहे. तसेच पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
दु:खद! छ. संभाजीनगरमध्ये मक्याची टाकी फुटली, मक्याखाली दाबून 4 जणांचा मृत्यू
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement