Marigold Farming: शेतीत काय आहे? हे बारावीत शिकणाऱ्या गौरवला विचारा, पाऊण एकरात झेंडू लावला, कमाई...
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Agriculture Success: बारावीत शिकणाऱ्या शेतकरी कुटुंबातील गौरवने पाऊण एकर शेतात झेंडू लागवड केली. शिक्षण घेत त्याने लाखांचं उत्पन्न काढलं आहे.
सोलापूर: सध्या बहुतांश तरुणांचा कल शिक्षण घेऊन एखादी नोकरी शोधण्याकडे असतो. परंतु, सोलापूर जिल्ह्यात बारावी विज्ञात शाखेत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यानं एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. परंपरागत शेतकरी कुटुंबातील गौरव शिंगाडे यानं शिक्षण घेत शेती सुरू केलीये. पाऊण एकर शेतात झेंडूची शेती केली असून त्यानं यातून एक लाख रुपयांपर्यंत कमाई केली आहे.
गौरव शिंगाडे हा मुळचा मोहोळ तालुक्याती सारोळे येथील शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे कुटुंब परंपरागत शेती करते. सध्या राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ येथे तो बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. शिक्षण घेत असतानाच त्याने वडिलांची साथ आणि सल्ला घेऊन शेती सुरू केली. आपल्या पाऊण एकर शेतात झेंडूची लागवड केली.
advertisement
कशी केली शेती?
गौरवने झेंडूच्या फुलाची लागवड करण्या अगोदर जमिनीची मशागत करून घेतली. त्यानंतर मल्चिंग पेपर टाकून एका फुटावर झेंडूच्या रोपांची लागवड केली. झेंडूच्या फुलावर करपा, बुरशी, अळी हा रोग पडू नये म्हणून काळजी घेतली. त्यासाठी आठवड्यातून एकदा रविवारी कॉलेजला सुट्टी असताना झेंडूच्या फुलांवर फवारणी केली. लागवडीपासून त्याला जवळपास 80 ते 90 हजार रुपयांचा खर्च आला. आतापर्यंत 10 तोडे झाले असून झेंडू विक्रीतून गौरवला 1 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
50 रुपये किलो भाव
view commentsसध्या झेंडूच्या फुलाला 50 रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. गौरव झेंडू फुलाची तोडणी करून मुंबई येथील दादर मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवत आहे. शिक्षण घेत शेती करत गौरवने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ज्यामुळे उच्चशिक्षित किंवा शिक्षण घेत असलेल्या तरुणांमध्ये शेती संदर्भात नवी ऊर्जा आणि संधी निर्माण होईल, हे मात्र नक्की.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Nov 18, 2025 3:20 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Marigold Farming: शेतीत काय आहे? हे बारावीत शिकणाऱ्या गौरवला विचारा, पाऊण एकरात झेंडू लावला, कमाई...









