रिस्क घेतली पण नाद केला! जे कुणाला जमलं नाही ते बीडच्या शेतकऱ्याने करून दाखवलं, आता करताय लाखोंत कमाई

Last Updated:

Success Story : मराठवाड्याच्या मध्यभागी असलेला बीड जिल्हा नेहमीच दुष्काळ, पाणीटंचाई आणि अपुऱ्या पावसामुळे ओळखला जातो. या कठीण परिस्थितीमुळे शेती करणे येथे मोठे आव्हान मानले जाते.

success story
success story
मुंबई : मराठवाड्याच्या मध्यभागी असलेला बीड जिल्हा नेहमीच दुष्काळ, पाणीटंचाई आणि अपुऱ्या पावसामुळे ओळखला जातो. या कठीण परिस्थितीमुळे शेती करणे येथे मोठे आव्हान मानले जाते. विशेषतः ज्या पिकांना जास्त पाणी लागते त्यांच्यासाठी ही एक मोठी कसोटीच असते. तरीदेखील परमेश्वर थोरात नावाच्या शेतकऱ्याने वेगवेगळे प्रयोग करून अवघड परिस्थितीवर मात केली आहे. आणि पारंपरिक पिकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेत त्यांनी बीडमध्ये प्रथमच अ‍ॅव्होकाडो लागवड करून दाखवली. आज ते यातून लाखोंची कमाई करत आहेत. मग आता हा प्रवास कसा सुरू झाला? हेच आपण जाणून घेणार आहोत..
वेगळं काहीतरी करायचं होतं
थोरात यांनी डाळिंबासारख्या पारंपरिक पिकांवर अवलंबून राहून काही विशेष साध्य होत नव्हते. मला वेगळं, नवीन आणि बीडमध्ये कोणीच न केलेलं काहीतरी करायचं होतं.” याच विचारातून त्यांनी अ‍ॅव्होकाडो पिकाचा अभ्यास सुरू केला. अ‍ॅव्होकाडो हे पौष्टिक मूल्यासाठी ओळखले जाते आणि रक्तदाब, मधुमेह व हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी ते उपयोगी मानले जाते. त्याची देशभरात वाढणारी मागणी पाहून परमेश्वरला हे पीक भविष्यातील संधी देणारे वाटले.
advertisement
शेतीमध्ये मिळवली डिप्लोमाची पदवी
शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे शेतीशी त्यांचा भावनिक आणि व्यावहारिक संबंध नेहमीच होता. शेतीमध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार केला. 2018 मध्ये दक्षिण भारताच्या एका भेटीदरम्यान त्यांना अ‍ॅव्होकाडोची कल्पना मिळाली. बेंगळुरूमध्ये भेटलेल्या शेतकऱ्यांकडून ‘अर्का सुप्रीम’ या अ‍ॅव्होकाडो जातीबद्दल माहिती मिळाली. जी उष्ण हवामानात उत्तम वाढते आणि महाराष्ट्रासारख्या उष्ण प्रदेशातही उत्पादन देते. ही जात बीडच्या हवामानासाठी योग्य असल्याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला.
advertisement
आयसीएचआर मधून प्रशिक्षण घेतलं
यासाठी त्यांनी आयसीएचआर – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च (IIHR) येथे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर कर्नाटकातून 50 अ‍ॅव्होकाडो रोपे मागवून 0.75 एकर क्षेत्रावर लागवड सुरू केली. बीडमधील उष्ण तापमान आणि पाणीटंचाई लक्षात घेऊन त्यांनी दोन फूट बाय दोन फूट खड्डे खोदून त्यात शेणखत टाकून माती सुपीक केली. पाण्याची बचत व्हावी म्हणून ठिबक सिंचन प्रणाली बसवली आणि शेतातील तलावात पावसाचे पाणी साठवून कोरड्या महिन्यांत वापरले. म्हणजेच सुरुवातीपासूनच त्यांनी शाश्वत व बचत करणारी शेती पद्धत स्वीकारली.
advertisement
मिळाला लाखोंचा नफा
त्यांच्या मेहनतीचे फळ 2021 मध्ये मिळाले, जेव्हा त्यांच्या अ‍ॅव्होकाडो झाडांना प्रथमच फळे आली. सुरुवातीला लोकांना अ‍ॅव्होकाडो विषयी जास्त माहिती नसल्यानं शंका होत्या. पण परमेश्वर यांनी नमुने वाटून लोकांना हे फळ चाखायला दिले आणि त्यानंतर हळूहळू मागणी वाढत गेली. 2022 मध्ये त्यांनी पहिली विक्री केली आणि प्रति फळ 200 रुपये भाव मिळाला. यामुळे त्यांना 3 लाख रुपयांहून अधिक नफा झाला.
advertisement
आज परमेश्वर अ‍ॅव्होकाडोची सेंद्रिय पद्धतीने लागवड करतात. सुरुवातीला रासायनिक खते वापरली असली तरी सेंद्रिय शेतीचे फायदे समजल्यावर त्यांनी नैसर्गिक खते, शेणखत आणि जैविक पद्धतीकडे वळण घेतले. त्यामुळे फळांची गुणवत्ता उत्तम राहते
आणि बाजार भावही चांगला मिळत आहे.
परमेश्वर यांचा हा प्रवास हे सिद्ध करतो की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य ज्ञान, प्रयोग आणि चिकाटी असेल तर शेतीत देखील नवीन संधी निर्माण होऊ शकतात. बीडसारख्या दुष्काळी भागात अ‍ॅव्होकाडोची शेती करून लागवड यशस्वी करून त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
रिस्क घेतली पण नाद केला! जे कुणाला जमलं नाही ते बीडच्या शेतकऱ्याने करून दाखवलं, आता करताय लाखोंत कमाई
Next Article
advertisement
'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement