इनाम वतनाची जमीन खरेदी करता येते का? नियम, कायदा काय सांगतो?

Last Updated:

Property Rules : महाराष्ट्रात इनाम वतन, सेवा वतन, देवस्थान किंवा धार्मिक संस्था यांच्या नावावरची जमीन अनेक ठिकाणी पाहायला मिळते. या जमिनी ऐतिहासिक काळात विशिष्ट सेवेसाठी धार्मिक कार्यासाठी किंवा गावकारभारासाठी दिल्या जात होत्या.

agriculture news
agriculture news
मुंबई : महाराष्ट्रात इनाम वतन, सेवा वतन, देवस्थान किंवा धार्मिक संस्था यांच्या नावावरची जमीन अनेक ठिकाणी पाहायला मिळते. या जमिनी ऐतिहासिक काळात विशिष्ट सेवेसाठी धार्मिक कार्यासाठी किंवा गावकारभारासाठी दिल्या जात होत्या. आजही अशा जमिनी अनेक गावे आणि तालुक्यांत अस्तित्वात आहेत. मात्र, मोठा प्रश्न असा की इनाम वतनाची जमीन खरेदी-विक्री करता येते का? सर्वसामान्य नागरिकाने ही जमीन खरेदी केली तर ती कायदेशीर ठरेल का? या बद्दलची सविस्तर जाणून घेऊया.
इनाम वतन जमीन म्हणजे काय?
पूर्वी शासन किंवा राजदरबार शेतजमीन एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला सेवेच्या बदल्यात वतन किंवा इनाम म्हणून देत असे. ही जमीन त्याच्या मालकीची असली तरी त्यावर काही विशिष्ट अटी लागू असत.जसे की, जमीन विक्रीस ठेवता येत नसे. तिचा वापर ठराविक उद्देशासाठी करणे आवश्यक असे.जमीन तात्पुरत्या करमुक्तीने दिलेली असे. म्हणजेच या जमिनींची स्वरूप इतर खाजगी जमिनींपेक्षा वेगळी होती.
advertisement
इनाम वतन जमीन खरेदी करता येते का?
सामान्य परिस्थितीत इनाम वतन जमीन कोणालाही थेट खरेदी करता येत नाही. कारण ती जमीन मुक्त वतन घोषित होईपर्यंत खरेदी-विक्रीवर कायदेशीर बंदी असते. जर परवानगी न घेता खरेदी केली तर नोंदणी जरी झाली तरी दस्तऐवज कायदेशीरदृष्ट्या अंमलात येत नाही.
जमीन खरेदीयोग्य कशी होते?
इनाम/वतन जमिनीचे व्यवहार करण्यासाठी प्रथम 'मुक्त वतन प्रमाणपत्र' मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुका कार्यालय (तहसील कार्यालय) येथे अर्ज करावा.  जमीन वतनातून मुक्त करण्यासाठी शुल्क भरावे.प्रशासनाची पडताळणी झाल्यानंतर जमीन मुक्त वतन घोषित होते. मुक्त झाल्यानंतरच त्या जमिनीवर खरेदी-विक्री, गहाण, वारसा नोंद, कर्ज घेणे यांसारखे सर्व व्यवहार पूर्णपणे कायदेशीर होतात.
advertisement
खरेदी करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?
इनाम/वतन जमीन घेतेवेळी खालील कागदपत्रे तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
जमीन मुक्त वतन प्रमाणपत्र आहे का?
7/12 उताऱ्यात मुक्त वतन अशी नोंद आहे का?
जमीन देवस्थान किंवा धार्मिक संस्थेच्या नावावर तर नाही ना?
जमीन वादात किंवा न्यायालयात प्रलंबित तर नाही ना?
ही सर्व तपासणी केल्याशिवाय पैसा देणे किंवा नोंदणी करणे धोकादायक ठरू शकते.
advertisement
चुकीच्या पद्धतीने खरेदी केल्यास काय होते?
मुक्त न झालेली इनाम वतन जमीन खरेदी केल्यास व्यवहार कायदेशीर होत नाही.
जमीन सरकारी ताब्यात जाऊ शकते. दिलेल्या पैशाची नुकसानभरपाई मिळत नाही.
खरेदीदाराच्या नावावर 7/12 नोंद होत नाही. कर्ज किंवा प्रकल्पासाठी जमिनीचा उपयोग होत नाही. म्हणूनच अशा जमिनींच्या व्यवहारात कायदेशीर पडताळणी अत्यावश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
इनाम वतनाची जमीन खरेदी करता येते का? नियम, कायदा काय सांगतो?
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुक पुढं जाणार की आरक्षण बदलणार?  सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट....
बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर
  • बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर

  • बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर

  • बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर

View All
advertisement