आवक घटली, बेदाणा दर पुन्हा तेजीत, सांगलीत किलोला मिळाला तब्बल एवढा उच्चांकी भाव

Last Updated:

यंदा द्राक्षांचे उत्पादन कमी झालेले आहे. त्याशिवाय द्राक्षाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा द्राक्षे मार्केटिंग करण्याकडे कल आहे. बेदाण्याचे उत्पादन कमी होणार असल्याने दर वाढत आहेत.

sangli bedana market
sangli bedana market
सांगली: सांगली मार्केट यार्डमध्ये बेदाणा सौद्यात 425 रुपये प्रति किलो असा उच्चांकी भाव मिळाला. यंदा द्राक्षांचे उत्पादन कमी झालेले आहे. त्याशिवाय द्राक्षाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा द्राक्षे मार्केटिंग करण्याकडे कल आहे. बेदाण्याचे उत्पादन कमी होणार असल्याने दर वाढत आहेत. गेल्यावर्षी पावसाचा मोठा फटका द्राक्षबागांना बसल्याने यंदा द्राक्षाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. बेदाण्याची द्राक्षे देखील विकली जात आहेत. याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर होत आहे. मार्केटयार्डमध्ये काही दिवसांपूर्वी प्रति किलोस 400 हून अधिक भाव टिकून आहे.
आजची बेदाणा आवक
सांगली मार्केटमध्ये आज एकूण 3721 क्विंटल आवक झाली. यापैकी 2947 क्विंटल हिरव्या बेदाण्याची आवक होऊन त्यास प्रतीनुसार 33 हजार ते 42 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच 736 क्विंटल पिवळ्या बेदाण्याची आवक होऊन त्यास 39000 रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला. तसेच काळ्या बेदाण्याची 38 क्विंटल इतकी सर्वात कमी आवक होऊन त्यास 4000 ते 13400 रुपये दरम्यान सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
यंदाही द्राक्ष हंगाम संकटात
सध्या शिल्लक बेदाणा कमी आणि द्राक्ष हंगामही अडचणीत असल्यामुळे बेदाण्याचे दर तेजीत राहातील, असा बेदाणा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी सांगली मार्केटमध्ये जास्तीत जास्त बेदाणा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती सुजय शिंदे यांनी केले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
आवक घटली, बेदाणा दर पुन्हा तेजीत, सांगलीत किलोला मिळाला तब्बल एवढा उच्चांकी भाव
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement