advertisement

Vihir Anudan Yojana 2024 : नवीन विहीर खोदण्यासाठी राज्य सरकार देतय अनुदान; अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या

Last Updated:

Agriculture News: आपल्या महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. अशातच वातावरणात होणारे बदल आणि पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच समस्येवर मात करण्यासाठी विहीर अनुदान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचे निकष काय आहेत? आवश्यक कागदपत्रे काय आहेत? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

News18
News18
मुंबई : आपल्या महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. अशातच वातावरणात होणारे बदल आणि पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच समस्येवर मात करण्यासाठी विहीर अनुदान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचे निकष काय आहेत? आवश्यक कागदपत्रे काय आहेत? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
सिंचन विहिरीं कार्यक्रम अंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष खालीलप्रमाणे आहे -
1) शेतक-याकडे त्याच्या नावावर कमीतकमी 0.60 हेक्टर जमीन असावी. यात कमाल मर्यादा नाही
2) लाभार्थी शेतक-याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील.(यासंदर्भात शाखा अभियंता / उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी / कर्मचारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्यांचा अहवाल घेण्यात यावा.)
advertisement
यापूर्वी अर्जदाराने विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
3) लाभार्थ्याकडे किमान 0.60 हेक्टर जमीन असायला हवी, त्याहून कमी क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यास विहीर मंजूर होणार नाही. मात्र दोन अथवा तीन लाभार्थ्यांनी त्यांची जमीन सलग असल्यास सामुदायिक विहीरीची मागणी केली तर ते सामुदायिकरित्या विहीर मिळण्यास पात्र असतील.
advertisement
4) यासंदर्भात पाण्याचा वापर व पाण्याची हिस्सेवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी रु 100 च्या स्टॅंम्प पेपर वर करार करावा.
आवश्यक कागदपत्रे काय आहे?
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
आधार कार्ड
ई-मेल आयडी
मोबाईल नंबर
उत्पन्नाचा दाखला
पासपोर्ट आकाराचे फोटो
बँक खात्याचा तपशील
रोजगार हमी योजनेचे कार्ड
7/12 व 8अ उतारा
सामूहिक विहीर असेल तर त्याचा सलग जमीन असल्याचा पंचनामा अनिवार्य
advertisement
अर्ज कसा कराल?
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. तसेच तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन सुद्धा अर्ज करू शकता.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Vihir Anudan Yojana 2024 : नवीन विहीर खोदण्यासाठी राज्य सरकार देतय अनुदान; अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement