स्वराज, सोनालिकाला पडतील मागे! महिंद्राचा नवीन ट्रॅक्टर गाजवतोय मार्केट, फीचर्स किंमत काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Mahindra 585 DI SP Plus : शेतीत दररोज नांगरणी, पेरणी, फवारणी, वाहतूक आणि कापणी यांसारखी अनेक कामे करावी लागतात. ही सर्व कामे हाताने करणे केवळ वेळखाऊ नाही तर खर्चिक देखील ठरते.
मुंबई : शेतीत दररोज नांगरणी, पेरणी, फवारणी, वाहतूक आणि कापणी यांसारखी अनेक कामे करावी लागतात. ही सर्व कामे हाताने करणे केवळ वेळखाऊ नाही तर खर्चिक देखील ठरते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हे शेतीचे प्रमुख व अत्यावश्यक साधन मानले जाते. जर तुम्ही अशाच एका शक्तिशाली, टिकाऊ आणि कमी इंधनात जास्त काम करणाऱ्या ट्रॅक्टरच्या शोधात असाल, तर महिंद्रा 585 DI SP Plus हे मॉडेल तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
Mahindra 585 DI SP Plus
हा ट्रॅक्टर 4-सिलेंडरच्या Extra Long Stroke (ELS) इंजिनसह येतो, जे 50 HP पॉवर आणि 197 Nm टॉर्क निर्माण करतो. 2100 RPM इंजिन स्पीडमुळे ट्रॅक्टर कमी इंधनात जास्त आणि स्थिर काम करतो. याचा PTO पॉवर 45 HP असल्यामुळे जवळपास सर्व कृषी अवजारांसोबत तो सहज चालतो. पिकांच्या फवारणीपासून ते वाहतुकीपर्यंत सर्व कामांसाठी हा ट्रॅक्टर महत्वाचा ठरतो.
advertisement
ELS इंजिनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंजिन ओव्हरहिट होत नाही, म्हणजे दीर्घकाळ काम केल्यानंतरही ट्रॅक्टर सहज चालतो. उच्च दर्जाच्या एअर फिल्टरमुळे इंजिनचे आयुष्य अधिक वाढते. तसेच 1800 किलो वजन उचलण्याची क्षमता असल्यामुळे जास्त प्रमाणात पिके किंवा साहित्य वाहून नेणे शक्य होते.
हा ट्रॅक्टर 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअरबॉक्ससह येतो, ज्यामुळे विविध कामांसाठी योग्य गती निवडणे शक्य होते. यात Partial Constant Mesh Transmission दिल्यामुळे गिअर बदलणे अधिक सोपे होते.
advertisement
स्टिअरिंगचे दोन पर्याय
ड्युअल अॅक्टिंग पॉवर स्टीअरिंग, मॅन्युअल स्टीअरिंग जे शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार निवडता येतात. तसेच ब्रेकिंग सिस्टमही मजबूत असल्यामुळे ट्रॅक्टर कठीण माती, चिखल किंवा उतार असलेल्या शेतातही सुरक्षित राहतो. यात 2WD ड्राइव्ह देण्यात आले असून त्यामुळे मायलेज जास्त मिळते.
सर्वात महत्वाचे म्हणजे हा ट्रॅक्टर विविध कृषी अवजारांसोबत सहज चालतो जसे की, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर, MB प्लो, टिपिंग ट्रेलर, लेव्हलर, थ्रेशर, पोस्ट होल डिगर, बेड प्लांटर, लोडर इत्यादी.
advertisement
किंमत आणि वॉरंटी काय?
view commentsभारतीय बाजारात महिंद्रा 585 DI SP Plus ट्रॅक्टरची किंमत 7.10 लाख रु (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. परंतु राज्य, RTO नोंदणी, विमा आणि रोड टॅक्स यांनुसार ऑन-रोड किंमत बदलू शकते. कंपनीकडून या मॉडेलवर 6 वर्षांची वॉरंटी दिली जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 12:45 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
स्वराज, सोनालिकाला पडतील मागे! महिंद्राचा नवीन ट्रॅक्टर गाजवतोय मार्केट, फीचर्स किंमत काय?


