advertisement

Farmer Success Story: शेतकऱ्यानं लावलं डोकं, केलं जर्सी कालवड पालन, आता वर्षाला 7 लाखांची उलाढाल, Video

Last Updated:

कांतीलाल राऊत यांनी जर्सी कालवड पालन करून त्यातून नवा आर्थिक मार्ग शोधला असून वर्षाला 6 ते 7 लाखांची उलाढाल करत आहेत. 

+
News18

News18

सोलापूर : अलीकडच्या काळात शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गाय पालन करत आहेत. परंतु दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी जर्सी गाय पालनापासून दूर जाताना दिसतोय. अशाही कठीण काळात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील शेतकरी कांतीलाल राऊत यांनी जर्सी कालवड पालन करून त्यातून नवा आर्थिक मार्ग शोधला असून वर्षाला 6 ते 7 लाखांची उलाढाल करत आहेत.
advertisement
मोहोळ तालुक्यातील शेतकरी कांतीलाल राऊत हे जर्सी कालवड म्हणजेच गायीचे वासरू आणून दूध विक्री करत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून गेल्या चार ते पाच वर्षांपासून कांतीलाल हे गायीचे वासरू आणून संगोपन करून त्यापासून मिळणाऱ्या दूध विक्रीकरणाचे काम करत आहेत. लहान गायीचे कालवड म्हणजेच वासरू अत्यंत कमी दरात ते खरेदी करतात आणि घरी घेऊन येतात.
advertisement
त्यानंतर त्यांचं व्यवस्थितरित्या संगोपन करून दूध विक्री करत आहेत. तसेच दुधापासून तूप तयार करून देखील बाजारात विक्री करण्याचे काम कांतीलाल करत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून सुरुवातीला दोन गायीचे वासरे आणून कांतीलाल राऊत यांनी पशुपालनास सुरुवात केली होती. तर आज जवळपास त्यांच्याकडे आठ ते दहा जर्सी गायी तसेच दोन ते तीन गायीचे वासरू आहेत.
advertisement
गाय किंवा वासरू आजारी पडू नये यासाठी दर दोन ते तीन महिन्याला पशुवैद्यकीय डॉक्टराला घरी आणून त्यांची तपासणी कांतीलाल हे करत आहेत. सध्या दुधाला भाव जरी नसला तरी जर्सी गायला 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत मागणी आहे. गायीच्या वासरांना लहानाचे मोठे करून त्याची विक्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दूध इथून उत्पन्न कांतीलाल हे घेत आहेत. त्या गाय विक्रीच्या व्यवसायातून वर्षाला 6 ते 7 लाखाची उलाढाल ते करत आहेत. शेतकऱ्यांनी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन किंवा शेळी पालन केल्यास अधिकाधिक उत्पन्न मिळेल असा सल्ला शेतकरी कांतीलाल राऊत यांनी दिला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: शेतकऱ्यानं लावलं डोकं, केलं जर्सी कालवड पालन, आता वर्षाला 7 लाखांची उलाढाल, Video
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement