Success Story : उच्चशिक्षित तरुणाची गुलाब शेती भारी, एक निर्णयाने पालटलं नशीब, कमाई तर पाहाच
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतकरी तानाजी हळदे यांनी एका एकरात गुलाबाची शेती केली आहे. यासाठी त्यांना 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे.
सोलापूर : पदवीधरपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे शहराकडे धाव न घेता सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी गावातील शेतकरी तानाजी हळदे यांनी एका एकरात गुलाबाची शेती केली आहे. यासाठी त्यांना 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. गुलाबाची लागवड करून चार वर्षे झाले असून आतापर्यंत 12 लाख रुपयांचे उत्पन्न तानाजी हळदे यांनी घेतले आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी तानाजी हळदे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
तानाजी हळदे यांना 2021 मध्ये एका एकरात सांबा जातीच्या गुलाबाची लागवड केली आहे. एका एकरामध्ये जवळपास 2 हजार सांबा गुलाबाच्या रोपांची लागवड तानाजी यांनी केली आहे. सांबा गुलाबाची लागवड करण्या अगोदर जमिनीची मशागत करून शेणखत टाकून गुलाबांच्या रोपांची लागवड केली.
advertisement
दररोज गुलाबाची तोडणी करून तानाजी सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुलाब विक्रीसाठी नेतात. सध्या गुलाबाला बाजारात 40 ते 50 रुपये किलो दराने भाव मिळत आहे. तर दसरा, दिवाळी सनासुदीच्या काळात याच गुलाबाला 100 ते 120 रुपये किलो दराने भाव मिळतो. तानाजी यांनी सांबा गुलाबांची लागवड चार वर्षांपूर्वी केली असून यासाठी त्यांना 70 ते 80 हजार रुपये खर्च आला होता. तर खर्च वजा करून आतापर्यंत तानाजी हळदे चार वर्षांतून 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलं आहे.
advertisement
पदवीधरपर्यंत शिक्षण घेतलेल्या तानाजी यांनी शेतीचा सखोल अभ्यास करून पारंपरिक पद्धतीने पिकवणारा होता फुल शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि गुलाबाच्या फुलाची लागवड केली आणि यातून त्यांना नफा देखील अधिक मिळत आहे. शहरातील तरुण खास करून ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरीच्या मागे शहरांमध्ये न जाता वडिलोपार्जित शेती असेल तर शेतीकडे लक्ष द्यावे नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न यातून मिळवता येईल, असा सल्ला पदवीधर पर्यंत शिक्षण घेतलेले तानाजी हळदे यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Nov 28, 2025 4:08 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : उच्चशिक्षित तरुणाची गुलाब शेती भारी, एक निर्णयाने पालटलं नशीब, कमाई तर पाहाच









