advertisement

Animal Care : शेतकऱ्यांनो, पावसाळ्यात जनावरे राहतील निरोगी, आधी करा हे काम! Video

Last Updated:

जिल्ह्यात सर्व पशूंना देण्यासाठी प्री मान्सून या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरण फेरीत लंपी, एचएस, लासोटा लस, अशा विविध प्रकारच्या लसीचे लसीकरण संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सर्व पशूंना देण्यासाठी प्री मान्सून या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरण फेरीत लंपी, एचएस, लासोटा लस, अशा विविध प्रकारच्या लसीचे लसीकरण संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पशुपालक आणि शेतकऱ्यांनी आपल्या पशूंना लागणाऱ्या लसी द्याव्यात. मान्सून पूर्व लस घेतली तर निश्चितच आपले पशुधन आजारी पडणार नाही, असे पशुधन विकास अधिकारी एम.जे तळेकर यांनी लोकल १८ सोबत बोलताना सांगितले.
प्री मान्सून या लसीकरणाला सुरुवात झाली असून यामध्ये गाय वर्गीय जनावरे असतील तर त्यांना लंपीम्हैस वर्गीयसाठी घटसर्पाची लस, दोन ते तीन वर्षांचे गोऱ्ह्यांना डीक्यूशेळी वर्गीयसाठी इटीव्हीची लस टोचून घ्यायला हवी. तसेच मेंढ्यांसाठी सीपॉक्स ही लस टोचावी. पोल्ट्रीमध्ये लासोट आणि दुसरी फौल पॉक्स या लसी पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या पशूंना टोचून घ्याव्यातयामुळे पशु आजारी पडणार नाहीअसे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
advertisement
महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग आणि छत्रपती संभाजीनगर पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने पावसाळ्यापूर्वी पशु आणि जनावरे आजारी पडू नये म्हणून प्री मान्सून या लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहेया मोहिमेचा फायदा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावाअसे आवाहन देखील तळेकर यांनी केले आहे. लसीकरण करण्याच्या प्रक्रियेत कोणाला काही अडचण आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून लसीकरण पूर्ण करू शकताअसे सांगण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Animal Care : शेतकऱ्यांनो, पावसाळ्यात जनावरे राहतील निरोगी, आधी करा हे काम! Video
Next Article
advertisement
Sunetra Pawar : अजित पवार गटाच्या नेत्यांची 'ती' गुप्त बैठक अन्  शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची इनसाइड स्टोरी
'ती' गुप्त बैठक अन् शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची Inside Story
  • राज्याच्या राजकारणात एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत.

  • राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या हालचाली करत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री

  • ही घटना फक्त शपथविधीपर्यंच मर्यादित नसून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या

View All
advertisement