Grow Bag : ग्रो बॅग तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्हीही आपल्या घरात भाजीपाल्याची लागवड करू शकता, ते कसं? जाणून घ्या

Last Updated:

Grow Bag Farming ; ग्रो बॅग ही एक पिशवी आहे जी कापड किंवा प्लास्टिकच्या तंतूंनी बनविलेली असते. त्यात कोणतीही वनस्पती किंवा भाज्या सहज उगवतात.

ग्रो बॅग म्हणजे काय?
ग्रो बॅग म्हणजे काय?
मुंबई : सध्या होम गार्डनिंग आणि किचन गार्डनिंग ही संकल्पना खूप लोकप्रिय होत आहे. त्यामुळे लोक घरात किचन किंवा टेरेस गार्डन विकसित करत असून यामाध्यमातून भाज्यांची शेती करत आहेत. अशातच आता ग्रो बॅग तंत्रज्ञान जास्तीचे लोकप्रिय ठरत आहे. मग आता हे ग्रो बॅग तंत्रज्ञान काय आहे? त्याचा वापर कसा करावा हे सविस्तरपणे जाणून घेऊ या
ग्रो बॅग म्हणजे काय?
ग्रो बॅग ही एक पिशवी आहे जी कापड किंवा प्लास्टिकच्या तंतूंनी बनविलेली असते. त्यात कोणतीही वनस्पती किंवा भाज्या सहज उगवतात. विशेषत: ज्या वनस्पतीचे मुळे खोलवर जात नाही त्यांचीच लागवड यात केली जाते. जसे की वनौषधी वनस्पती, हिरव्या पालेभाज्या हे ग्रो बॅगमध्ये सहज पिकवता येतात.
या प्रकारच्या भाज्यांची लागवड करू शकता?
सर्वच प्रकारचे फळे किंवा भाज्या ग्रो बॅगमध्ये पिकवता येत नाहीत. तुम्ही फक्त काही निवडक भाज्याच वाढवू शकता. जसे की टोमॅटो, मिरची, गाजर, वांगी, वाटाणे, कोथिंबीर, लसूण, मेथी, औषधी वनस्पती इत्यादी
advertisement
लागवड कशी करावी?
योग्य ग्रो बॅगची निवड करा तसेच ती मजबूत आहे की नाही याची देखील खात्री करा. आणि मग रोपांची किंवा बियांची लागवड करा. ग्रो बॅगमध्ये उगवलेल्या झाडांना जास्त पाणी लागत नाही. त्याची माती सहजपणे सुकत असते. शक्यतो ती बॅग मोकळ्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही पिशवी बदलत असाल तर पिशवी साबणाने धुवा, म्हणजे त्यात वाढणारे बॅक्टेरिया आणि बुरशी मरून जाईल.
advertisement
ग्रो बॅगचे फायदे काय आहेत?
दरम्यान, ग्रो बॅगमध्ये बागकाम करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात ग्रो बॅगमध्ये रोपे वाढवणे फायदेशीर ठरते. कारण वायुवीजनामुळे झाडे सुकत नाहीत आणि ते मरतही नाहीत. तसेच, तुम्ही सहजपणे या बॅग कुठेही घेऊन जाऊ शकता कारण त्या हलक्या असतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Grow Bag : ग्रो बॅग तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्हीही आपल्या घरात भाजीपाल्याची लागवड करू शकता, ते कसं? जाणून घ्या
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement