मार्केटमध्ये जबरदस्त मागणी! एक फळाला 100 रु भाव, लागवड करून 25 वर्ष करा बक्कळ कमाई

Last Updated:

Agriculture News : सध्या आरोग्यविषयक जागरुकतेमुळे भारतात 'अवॉकाडो' या विदेशी फळाची मागणी झपाट्याने वाढत आहे. पोषणमूल्यांनी भरपूर, 'सुपरफूड' म्हणून ओळखले जाणारे हे फळ आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नफा कमावण्याचे नवे साधन ठरत आहे.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : सध्या आरोग्यविषयक जागरुकतेमुळे भारतात 'अवॉकाडो' या विदेशी फळाची मागणी झपाट्याने वाढत आहे. पोषणमूल्यांनी भरपूर, 'सुपरफूड' म्हणून ओळखले जाणारे हे फळ आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नफा कमावण्याचे नवे साधन ठरत आहे. योग्य नियोजन, हवामान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अवॉकाडो शेती करून शेतकरी लाखो रुपयांचा नफा मिळवू शकतात.
अवॉकाडो फळाचे पोषणमूल्य आणि बाजारपेठ
अवॉकाडोमध्ये भरपूर प्रमाणात 'गुड फॅट्स', फायबर्स, प्रोटीन, व्हिटॅमिन ई, सी, बी-6 आणि पोटॅशियम असते. हे हृदयविकार, कोलेस्टेरॉल नियंत्रण, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे शहरी भागात याची मागणी प्रचंड आहे. एक अवॉकाडो फळ सध्या बाजारात 150 ते 300 रुपयांपर्यंत विकले जाते. हॉटेल्स, हेल्थ क्लिनिक्स, सुपरमार्केट आणि ऑनलाइन मार्केटमुळे याचे दर अजूनही चढते आहेत.
advertisement
महाराष्ट्रात कुठे होऊ शकते यशस्वी लागवड?
अवॉकाडोला थंड आणि दमट हवामान आवडते. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांतील डोंगराळ भागात याची शेती यशस्वीपणे करता येईल.100 - मिमी पावसाळा, 15-30 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या भागात ही झाडं चांगली वाढतात.
लागवड आणि व्यवस्थापन
लागवडीचा हंगाम: जुलै ते सप्टेंबर
एकरी झाडांची संख्या: 70 ते 80 (8 मी x 5 मी अंतरावर)
advertisement
पहिला उत्पन्न कालावधी: 3-4 वर्षांनी
पूर्ण उत्पादन कालावधी: 7 वर्षांपासून 25 वर्षांपर्यंत
अवॉकाडो झाडांना खूप जास्त पाणी नको. ठिबक सिंचन वापरल्यास झाडांची वाढ चांगली होते. जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या फळाचे अधिक दर मिळतात.
उत्पन्न आणि नफा
एक परिपक्व झाड दरवर्षी 80 ते 150 फळं देऊ शकते. एका फळाची सरासरी किंमत 150 रुपये धरली, तर एका झाडापासून दरवर्षी किमान 12,000 उत्पन्न मिळू शकते. एका एकरात 70 झाडं धरली, तर वार्षिक उत्पन्न 8-10 लाखांपर्यंत जाऊ शकते. देखभाल खर्च वजा केल्यास सुद्धा नफा 5 रु लाखांहून अधिक होऊ शकतो.
advertisement
नवीन युगातील शेतीसाठी उत्तम पर्याय
अवॉकाडो शेती ही पारंपरिक शेतीपासून थोडी वेगळी असली, तरी कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणारी, निर्यातक्षम आणि बाजारपेठ असलेली शेती आहे. योग्य प्रशिक्षण, रोपांची निवड आणि व्यवस्थापन केल्यास महाराष्ट्रातील शेतकरीही या फळाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा नफा कमावू शकतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
मार्केटमध्ये जबरदस्त मागणी! एक फळाला 100 रु भाव, लागवड करून 25 वर्ष करा बक्कळ कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement