advertisement

AI द्वारे शेती कशी करायची? एकरी किती खर्च येतो? बारामती पॅटर्न चर्चेत

Last Updated:

AI Farming : आधुनिक युगात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मोठ्या वेगाने वापरली जात आहे. पिकांचे विश्लेषण, खत-पाणी व्यवस्थापन, तणनियंत्रण, हवामान अंदाज आणि उत्पादन अंदाज यासाठी AI तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : आधुनिक युगात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मोठ्या वेगाने वापरली जात आहे. पिकांचे विश्लेषण, खत-पाणी व्यवस्थापन, तणनियंत्रण, हवामान अंदाज आणि उत्पादन अंदाज यासाठी AI तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना “AI च्या माध्यमातून शेती करण्यासाठी किती खर्च येतो?” असा प्रश्न पडतो. मग आता या बद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
1) मूलभूत AI-सक्षम शेती (Basic Level)
याचा अंदाजे खर्च 40,000 रु ते 80,000 रु प्रतिएकर येऊ शकतो. शेतकरी डिजिटल साधनांचा वापर करून पिकांची उत्तम निगा राखतात. यात खालील गोष्टींचा समावेश होतो जसे की,
advertisement
ड्रिप इरिगेशन सिस्टम : 35,000 ते 60,000 रु खर्च,
मातीतील आर्द्रता आणि तापमान सेन्सर : 3,000 ते 10,000 खर्च
मोबाइलवर आधारित AI अॅप्स (पिक निरिक्षण, रोग निदान) : 200 ते 500 रु प्रति महिना खर्च
advertisement
2) मध्यम स्तरावरील AI शेती (Intermediate Level)
या साठी अंदाजे 80,000 ते 2.5 लाख रु प्रतिएकर खर्च येतो. या प्रकारात आणखी प्रगत स्मार्ट उपकरणे वापरली जातात. 
अत्याधुनिक माती व हवामान सेन्सर सेट : 20,000 ते 50,000 रु
advertisement
IoT गेटवे (डेटा सर्व्हरशी जोडणी) : 15,000 ते 25,000 रु
ड्रोनद्वारे निरीक्षण (NDVI स्कॅन, रोग-तण शोध) : प्रति एकर 300 ते 500 (भाड्याने)
ड्रोनद्वारे औषध फवारणी : प्रति एकर 250 ते 400 रु
advertisement
AI Farm Management Software : 10,000 ते 30,000 रु वार्षिक खर्च
या पातळीवर पिकांची वास्तविक वेळेत माहिती मिळते. कोणत्या भागात किती पाणी वा खत द्यायचे हे AI स्वयंचलितपणे सांगते. त्यामुळे उत्पादनात वाढ आणि खर्चात घट दिसून येते.
advertisement
3) पूर्ण AI आधारित शेती (Advanced Level / Smart Farm)
यासाठी 2.5 लाख ते 25 रु लाख प्रतिएकर खर्च येतो. ही पद्धत पूर्णपणे स्वयंचलित असते.
उच्च क्षमतेचे ड्रोन (स्प्रे + मॅपिंग) : 3 लाख ते 10 लाख रु
रोबोटिक यंत्रणा (तण काढणे, पिक निरीक्षण) : 4 लाख ते 15 लाख रु
AI आधारित स्मार्ट सिंचन प्रणाली (पूर्ण ऑटोमेशन) : 1.5 लाख ते 5 लाख रु
हवामान स्टेशन + डेटा अॅनालिटिक्स : 50,000 ते 1.5 लाख रु इतका खर्च येतो.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
AI द्वारे शेती कशी करायची? एकरी किती खर्च येतो? बारामती पॅटर्न चर्चेत
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement