advertisement

लव्हाळा, घोळू, केना सगळंच होणार गायब! कांदा पिकासाठी 5 तणनाशकं कोणते? अकोला कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला सल्ला

Last Updated:

Agriculture News :  कांदा हे भारतातील सर्वाधिक लागवड होणारे आणि महत्त्वाचे भाजीपाला पीक मानले जाते. परंतु या पिकाची वाढ संथ असते, मुळे उथळ आणि पाने अरुंद असल्याने कांदा तणांशी पोषकद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करू शकत नाही.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : कांदा हे भारतातील सर्वाधिक लागवड होणारे आणि महत्त्वाचे भाजीपाला पीक मानले जाते. परंतु या पिकाची वाढ संथ असते, मुळे उथळ आणि पाने अरुंद असल्याने कांदा तणांशी पोषकद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करू शकत नाही. यामुळे उत्पादनात तब्बल 40 ते 80 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. तणांचा प्रकार, घनता आणि स्पर्धात्मकता यांच्या आधारे ही घट अधिक वाढू शकते. त्यामुळे कांदा पिकात योग्य तण नियंत्रण हा उत्पादन वाढीचा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.
advertisement
निंदणीद्वारे तण नियंत्रणात येणाऱ्या अडचणी
कांदा पिकात हाताने निंदणी करून तण काढणे ही पारंपरिक आणि प्रभावी पद्धत असली तरी कमी ओळीतील अंतर आणि भरपूर मजुरी लागते. वेळेवर मजूर न मिळाल्यास तण जास्त प्रमाणात वाढतात आणि उत्पादनात मोठी घट येते. तसेच निंदणी करताना कांद्याच्या रोपांचे नुकसान होण्याचीही शक्यता वाढते. म्हणूनच तण नियंत्रणासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर हा उत्तम आणि किफायतशीर पर्याय ठरतो.
advertisement
उगवणपूर्व आणि उगवणपश्चात तणनाशकांचा वापर
कांद्याची पुनर्लागवड झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत उगवणपूर्व तणनाशकांची फवारणी करणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तण वाढण्याची शक्यता कमी होते आणि कांद्याची वाढ सुरळीत होते. त्यानंतर आवश्यकतेनुसार उगवणपश्चात तणनाशकांचा वापर केल्यास तणांची संख्या प्रभावीपणे कमी करता येते.
advertisement
कांदा पिकासाठी प्रामुख्याने पेडीमेथालिन, ऑक्सिफ्लोरोफेन, प्रोपाक्विझाफॉप, स्विचालोफॉप यांसारखी निवडक तणनाशके वापरली जातात. उगवणपूर्व फवारणी न झाल्यास नंतरच्या टप्प्यात तणांची बाढ वाढते आणि कांदा निर्मितीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत उगवणपश्चात तणनाशके अत्यंत उपयोगी ठरतात आणि निंदणीवरील खर्चही कमी होतो.
advertisement
तणनाशक फवारणीवेळी कोणती काळजी घ्यावी?
उगवणपूर्व तणनाशके चांगली मशागत केलेल्या, डेकनेरहित, सपाट आणि ओलावा असलेल्या जमिनीवर फवारावीत. तणनाशक फवारणीसाठी स्वतंत्र पंप वापरावा. दोन भिन्न तणनाशके किंवा इतर रसायने एकत्र मिसळून फवारणी करू नये. तसेच पलॅट फॅन किंवा फ्लड जेट नोजल वापरावेत. फवारणीपूर्वी लेबलवरील सूचना नीट वाचाव्यात आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. एकाच तणनाशकाचा सतत वापर टाळावा कारण त्यामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होते.
advertisement
तणनाशक अंश व्यवस्थापनासाठी उपाय
शिफारसी प्रमाणेच मात्रा वापरावी. योग्य फेरपालट पद्धती अवलंबावी. सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीतील सूक्ष्मजीव वाढतात. ज्यामुळे तणनाशकांचे विघटन जलद होते. तसेच जमिनीची खोल नांगरट करावी.
वेळेनुसार तण व्यवस्थापन
लागवडीनंतर 3 दिवसांत मकर गवत, विकटा, सावा, मोती दुधी, केला, कुंजर यांसारख्या तणांवर प्रभावी ठरते. उगवणपश्चात (1215 दिवसांनी) चिकटा गवत, सम्था, राननाचणी, चाकवत, माठ यांसारख्या तणांवर नियंत्रण मिळवते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
लव्हाळा, घोळू, केना सगळंच होणार गायब! कांदा पिकासाठी 5 तणनाशकं कोणते? अकोला कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला सल्ला
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement