सामूहिक मालमत्तेतील स्वत:चा हिस्सा विकता येणं शक्य आहे का? नियम काय सांगतो?

Last Updated:

Property Rules : शहरात असो वा गावात, घर, जागा किंवा शेतीसारख्या मालमत्तेवर अनेकदा एकापेक्षा जास्त लोकांचा मालकीहक्क असतो. अशा परिस्थितीला ‘सामायिक मालकी’ म्हटलं जातं.

Property Rules
Property Rules
मुंबई : शहरात असो वा गावात, घर, जागा किंवा शेतीसारख्या मालमत्तेवर अनेकदा एकापेक्षा जास्त लोकांचा मालकीहक्क असतो. अशा परिस्थितीला ‘सामायिक मालकी’ म्हटलं जातं. ही स्थिती दिसायला साधी असली तरी प्रत्यक्षात मालमत्तेची खरेदी-विक्री करताना अनेक गुंतागुंतीचे कायदेशीर प्रश्न उभे राहतात. विशेषतः, जर तुम्हाला तुमचा हिस्सा विकायचा असेल आणि इतर सहहिस्सेदार तयार नसतील, तर प्रक्रिया आणखी कठीण होते. त्यामुळे सामायिक मालमत्तेबाबतचे कायदे समजून घेणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे.
सामायिक मालकी म्हणजे काय?
सामायिक मालकी म्हणजे एका मालमत्तेवर अनेक सहहिस्सेदारांचा हक्क असतो, पण तो हक्क ‘अविभाजित’ स्वरूपात असतो. म्हणजेच कोणाचा हिस्सा नेमका कुठल्या जागेवर आहे, हे स्पष्ट होत नाही. प्रत्येकाचा हक्क समान असतो, पण जागेवरची वाटणी झालेली नसते. यालाच ‘अविभाजित हिस्सा’ (Undivided Share) म्हटलं जातं.
विक्रीची सोपी प्रक्रिया
जर सर्व सहहिस्सेदारांनी एकत्र येऊन मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला, तर प्रक्रिया तुलनेने सोपी असते. सगळ्यांच्या सह्या करून खरेदीखत (Sale Deed) तयार केल्यास विक्री कायदेशीरदृष्ट्या निर्विवाद ठरते. अशावेळी खरेदीदारालाही कोणताही धोका राहत नाही.
advertisement
काही सदस्य विक्रीस तयार नसतील तर?
संकट तेव्हा उद्भवतं, जेव्हा एखादा सहहिस्सेदार आपला हिस्सा विकायचा ठरवतो, पण इतर सहकारी तयार नसतात. कारण मालमत्ता विभागलेली नसल्याने विक्रेता स्वतःचा हिस्सा प्रत्यक्ष दाखवू शकत नाही. अशा वेळेस ‘वाटपाचा दावा’ (Partition Suit) दाखल करून न्यायालयाच्या आदेशाने मालमत्तेची विभागणी करून घेणं आवश्यक असतं. विभागणी झाल्यानंतरच स्वतंत्र हिस्सा कायदेशीररीत्या विक्रीसाठी उपलब्ध होतो.
advertisement
सहहिस्सेदारांचा पहिला हक्क
कायद्यानुसार, जर एखाद्याने आपला हिस्सा विकायचा असेल तर आधी इतर सहहिस्सेदारांना तो हिस्सा खरेदी करण्याची ‘पहिली संधी’ (Right of Preemption) द्यावी लागते. विशेषतः कुटुंबाबाहेरील व्यक्तीला विक्री करताना हे अधिक महत्त्वाचं ठरतं. अनेकदा न्यायालयं देखील या नियमाला प्राधान्य देतात.
विक्री करताना लक्षात ठेवावयाच्या बाबी
खरेदीखतात स्पष्टता ठेवा : विक्री होत असलेल्या अविभाजित हिश्श्याचा उल्लेख स्पष्ट असावा.
advertisement
सहहिस्सेदारांना नोटीस द्या : त्यांना विक्रीबाबत माहिती देणं कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित ठरतं.
वाटपाचा दावा करा : गरज पडल्यास न्यायालयीन वाटपाद्वारे स्वतःचा हिस्सा वेगळा करून घ्या.
अनुभवी वकीलाचा सल्ला घ्या : कुटुंबीयांमधील वाद आणि कायदेशीर प्रक्रिया नीट हाताळण्यासाठी तज्ज्ञांचा मार्गदर्शन घेणं शहाणपणाचं ठरतं.
दरम्यान, सामायिक मालकीतून हिस्सा विकणं ही केवळ भावनिक नाही तर पूर्णपणे कायदेशीर बाब आहे. योग्य माहिती, कायदेशीर सल्ला आणि वेळेवर केलेली कारवाई यामुळेच विक्रीची प्रक्रिया निर्विघ्न पार पडू शकते.
मराठी बातम्या/कृषी/
सामूहिक मालमत्तेतील स्वत:चा हिस्सा विकता येणं शक्य आहे का? नियम काय सांगतो?
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement