घायवळच्या भावावर गुन्हे नाहीत म्हणणाऱ्यांचा मुखवटा फाटला; काळा इतिहास समोर, गुन्ह्यांची कुंडली बाहेर
- Published by:Prachi Amale
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याच्यावर कोणकोणते गुन्हे आहेत यादी यादीच न्यूज १८ लोकमतच्या हाती लागली आहे.
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिला गेल्याने गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सध्या विरोधकांच्या रडारवर आहेत. योगेश कदम यांच्या शिफारसीने सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर योगेश कदम यांनी स्पष्टीकरण देताना सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते, असं म्हणत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता सचिन घायवळ याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीत समोर आली आहे.
कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणावरून पुणे पोलिसांचे अक्षरशः नाक कापले गेले आहे. अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निलेश घायवळचा सख्खा भाऊ आणि कुख्यात गुंड सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला आहे. या परवान्यास पोलिसांचा विरोध असूनही कदमांनी शस्त्र परवाना दिला आहे. घायवळ याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नोंद नाही म्हणून त्यांना मी शस्ञ परवाना दिला असे म्हटले आहेत मात्र सचिन घायवळ याच्यावर कोणकोणते गुन्हे आहेत यादी यादीच न्यूज १८ लोकमतच्या हाती लागली आहे.
advertisement
सचिन घायवळवर एकूण पाचपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सचिन घायवळवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी
- महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हे कायदा (मोक्का) निलेश घायवळ गँगच्या प्रमुख सचिन घायवळ सदस्य म्हणून गुन्हेगारी कारवाईमध्ये सहभाग.पप्पू ऊर्फ सचिन कुडले खून प्रकरणात आरोपी क्रमांक ३ (अपील क्रमांक २५/२०१४ पुणे (स्पेशल कोर्ट) २०१४ बॉम्बे हायकोर्ट अॅपील तपास चालू)
- खुनाचा प्रयत्न शत्रू गँगविरुद्ध हल्ले आणि धमक्या. निलेशच्या टोळीशी जोडलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभाग.
advertisement
पुणे शहर (कोथरूड) २०१०-२०१५ (जुने केसेस; पुरावे सुरू)
advertisement
advertisement
संबंधित केस : हे प्रकरण सचिन घायवळच्या MCOCA केसमध्येही उल्लेखित आहे, ज्यात तो आरोपी क्रमांक ३ होता.
advertisement
गृहराज्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
विरोधकांच्या टीकेनंतर गृहराज्यमंत्री म्हणाले, गृहराज्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसलोय तेव्हापासून आजवर गुन्हे दाखल असलेल्या कोणत्याही व्यक्तीला किंवा प्रलंबित गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना देण्याची शिफारस केली नाही. मी या भूमिकेवर ठाम आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम माझ्याकडून आजवर कधीच झालेलं नाही आणि यापुढेही होणार नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 09, 2025 4:10 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
घायवळच्या भावावर गुन्हे नाहीत म्हणणाऱ्यांचा मुखवटा फाटला; काळा इतिहास समोर, गुन्ह्यांची कुंडली बाहेर