पोटभर भात खा! शुगर वाढणार नाही, बाजरीपासून तयार केला तांदूळ, मार्केटमध्ये कधी येणार? दर कसा असणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : आपल्या देशात तांदूळ हा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.त्याच्या खूप साऱ्या तांदळाच्या प्रजाती पाहायला मिळतात.
मुंबई : आपल्या देशात तांदूळ हा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.खूप साऱ्या तांदळाच्या जाती पाहायला मिळतात. तसेच शास्त्रज्ञ देखील संशोधन करून वेगवेगळे वाण विकसित करत असतात. त्याला लोकांची पसंती देखील असते. सध्या मधुमेह असणाऱ्या लोकांना भात खाता येत नाही. त्यामुळे शुगरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असते. अशातच आता यावर एक तांदळारूपी रामबाण औषध तयार करण्यात आले आहे. हा तांदूळ मधुमेह असणाऱ्या लोकांनाही खाता येणार आहे. मग आता या तांदळाची खासियत काय आहे? मार्केमध्ये कधी येणार? दर कसा असणार? याबद्दलची माहिती जाणून घेऊ या..
तांदळाचा नवा प्रकार आहे तरी कसा?
सोनीपत येथील राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM) येथील शास्त्रज्ञांनी बाजरीपासून तयार केलेला एक विशेष प्रकारचा जाड तांदूळ विकसित केला आहे. हा तांदूळ मधुमेह असलेल्या लोकांनाही बिनधास्तपणे खाता येईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
तांदळाचा नवा प्रकार आहे तरी कसा?
NIFTEM चे संचालक डॉ. हरिंदर सिंग ओबेरॉय यांनी सांगितले की, डॉ. अंकुर ओझा आणि त्यांच्या टीमने बाजरी आणि दोन वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळांचे मिश्रण करून हा तांदूळ तयार केला आहे. या शोधाचे पेटंटही घेण्यात आले आहे. या तांदळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो अँटीऑक्सिडंट असून फक्त ५ मिनिटांत खीर बनवता येणार आहे.
advertisement
नवीन तंत्रज्ञानाचा वापर
डॉ. ओझा यांच्या टीमने या तांदळासाठी एक्सट्रजन तंत्रज्ञान वापरलं आहे.या प्रक्रियेत धान्यांना उच्च दाब आणि तापमानाखाली ठेवून नवीन आकार दिला जातो. त्यामुळे या तांदळाला हलका तपकिरी रंग आणि सामान्य तांदळासारखी चव मिळते.
वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये मिळाली मान्यता
या नवीन तांदळाला नुकतीच वर्ल्ड फूड इंडिया 2025 या दिल्लीतील प्रदर्शनात मान्यता मिळाली आहे. त्याच कार्यक्रमात NIFTEM आणि उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये त्याच्या बाजारात विक्रीसाठी करार करण्यात आला आहे.
advertisement
तीन धान्यांचं मिश्रण
हा तांदूळ तयार करताना पांढरा तांदूळ, काळा मीठ तांदूळ आणि बाजरी या तीन घटकांचे मिश्रण करण्यात आले आहे. हे मिश्रण पूर्णपणे नैसर्गिक असून त्यात कोणतेही कृत्रिम रंग किंवा रसायन वापरण्यात आले नाही.
सहा वाट्या खीर तयार होणार
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पॅकेटमधून सुमारे सहा वाट्या खीर तयार करता येते. ही खीर फक्त पाच मिनिटांत तयार होते आणि चवीलाही अतिशय छान लागते. यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते, जे सामान्य तांदळाच्या खिरीत नसते. त्यामुळे हा तांदूळ केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही लाभदायक आहे.
advertisement
मार्केटमध्ये तांदूळ कधी येणार? दर कसा असणार?
हा तांदूळ बाजारात आणण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने कुंडली (सोनीपत) येथील संस्थेशी भागीदारी केली आहे. त्यामुळे पुढील महिन्याभरात हा तांदूळ सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. तसेच हा तांदूळ सध्याच्या तांदळापेक्षा सुमारे २० टक्के स्वस्त असेल.
मिश्रण काय असणार?
या तांदळात साखर, मल्टीग्रेन मिश्रण, मखाना ग्रिट्स, दुधाचे सॉलिड, बदाम, पिस्ता आणि वेलची यांचा समावेश आहे. तो दोन वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध असेल.
advertisement
एकूणच, या तांदळारूपी मधुमेहग्रस्त लोकांना औषध मिळणार आहे. तसेच इतरांना आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 10:45 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
पोटभर भात खा! शुगर वाढणार नाही, बाजरीपासून तयार केला तांदूळ, मार्केटमध्ये कधी येणार? दर कसा असणार?


