'परफॉर्म कर, नाहीतर बाहेर बस...', सिडनीत गौतम गंभीरने 'लाडक्या' हर्षित राणाला दिली होती वॉर्निंग, ड्रेसिंग रुममधलं संभाषण लीक!

Last Updated:

Gautam Gambhir Give warning to Harshit rana : हर्षितच्या खराब सुरुवातीनंतर गंभीरने त्याला स्पष्ट शब्दात खडसावले होते, असा खुलासा देखील कोचने केला आहे.

Gautam Gambhir Give warning to Harshit rana
Gautam Gambhir Give warning to Harshit rana
Gautam Gambhir On Harshit rana : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने धारदार बॉलिंग केली. यामध्ये हर्षित राणाने 4 विकेट्स घेऊन टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिलं होतं. हर्षितच्या धारदार बॉलिंगमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत गुंडाळलं. अशातच सिडनीवर खेळण्याआधी गौतम गंभीर याने लाडक्या खेळाडूला देखील सोडलं नाही. गौतमने हर्षित राणा याला वॉर्निंग दिली होती.

स्वतःवर विश्वास ठेव, कोचने दिला सल्ला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा प्रचंड दबावाखाली होता. त्याने आपला बालपणीचा कोच श्रवण यांना फोन करून, बाहेरचा नॉईज म्हणजेच टीका आपल्या कामगिरीने शांत करायचा आहे, असं म्हटलं होतं. कोच श्रवण यांनी त्याला फक्त 'स्वतःवर विश्वास ठेव' असं सांगितलं. श्रवण यांनी यावेळी गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाबद्दल एक महत्त्वाचा किस्सा सांगितला.
advertisement

गंभीरने स्पष्ट शब्दात खडसावलं

अनेक जण म्हणतात की राणा हा गंभीरच्या जवळचा आहे, पण गंभीरला गुणवत्ता ओळखता येते आणि तो अशा खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देतो. गंभीरने अनेक क्रिकेटपटूंना पाठिंबा दिला असून त्यांनी आपल्या टीमसाठी कमाल केली आहे, असे श्रवण म्हणाले. हर्षितच्या खराब सुरुवातीनंतर गंभीरने त्याला स्पष्ट शब्दात खडसावले होते, असा खुलासा देखील कोचने केला आहे.
advertisement

परफॉर्म कर, वरना बाहर बिठा दूंगा

गंभीरने त्याला थेट सांगितले होते, "परफॉर्म कर, वरना बाहर बिठा दूंगा" (चांगली कामगिरी कर, नाहीतर तुला टीममधून बाहेर बसवेन). गंभीर हा खेळाडू कोणताही असो, त्याला स्पष्ट संदेश देतो, असंही श्रवण यांनी सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलंय.

हर्षित राणाच्या 4 विकेट्स

advertisement
पर्थ आणि ऍडलेड येथील सामन्यांमध्ये हर्षित राणाची सुरुवात खराब झाली होती. डाव्या हाताचा पेसर अर्शदीपच्या ऐवजी त्याची सिडनी वनडेसाठी निवड झाली, तेव्हा तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. मात्र, हेड कोच गौतम गंभीरने त्याला वॉर्निंग दिली. त्यामुळे हर्षित राणा सिडनीमध्ये चांगली कामगिरी करू शकला. तिसऱ्या वनडेमध्ये हर्षित राणाने 4 विकेट्स घेऊन टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'परफॉर्म कर, नाहीतर बाहेर बस...', सिडनीत गौतम गंभीरने 'लाडक्या' हर्षित राणाला दिली होती वॉर्निंग, ड्रेसिंग रुममधलं संभाषण लीक!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement