दसऱ्याच्या निमित्ताने ऊस उत्पादकांना मोठा दिलासा! या कारखान्याकडून १०६ कोटी रु खात्यात जमा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यासह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले असताना, पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे.
हिंगोली ल जिल्ह्यातील वसमत तालुक्यासह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले असताना, पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. दसऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तब्बल १०६ कोटी ६५ लाख रुपयांचा तिसरा हप्ता वर्ग करण्यात आला आहे.
तिसरा हप्ता खात्यावर जमा
सन २०२४-२५ गाळप हंगामासाठी कारखान्याने प्रति टन २७५० रुपयांचा भाव जाहीर केला होता. यापैकी शेतकऱ्यांना आधीच २६७० रुपये दिले गेले होते. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी झालेल्या गाळप हिशेबानुसार, एकूण ३ लाख ९९ हजार ४४२ मेट्रिक टन उसापोटी ७० रुपये प्रति टन दराने तिसऱ्या हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी आर्थिक आधार मिळाला आहे.
advertisement
शेतकऱ्यांचा दिलासा
पूर आणि अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, तर काही ठिकाणी नदी-ओढ्यांना आलेल्या पुरामुळे जीवित आणि वित्तहानी झाली आहे. शासनाकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना कारखान्याकडून मिळालेली रक्कम दिलासादायक ठरली आहे. दसऱ्यासारख्या मोठ्या सणापूर्वी निधी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.
चौथा हप्ता दिवाळीपूर्वी
कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आणखी आर्थिक दिलासा मिळणार आहे.
advertisement
नवे गाळप हंगामाचे नियोजन
पूर्णा सहकारी साखर कारखाना २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी सज्ज झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात गाळपास सुरुवात होणार असून, हंगामपूर्व सर्व कामे पूर्ण झाल्याची माहिती कार्यकारी संचालक केशव आकुसकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, शासनाच्या निर्देशानुसार गाळप हंगाम सुरू करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी कारखाना कटिबद्ध आहे.
advertisement
शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
तिसऱ्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याचे आभार मानत म्हटले की, "अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असले तरी सणापूर्वी मिळालेला निधी आमच्यासाठी मोठा आधार आहे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 11:09 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
दसऱ्याच्या निमित्ताने ऊस उत्पादकांना मोठा दिलासा! या कारखान्याकडून १०६ कोटी रु खात्यात जमा