Mahogany Tree Farming : पारंपरिक शेती पद्धतीला बगल, शेतकऱ्याने केली 500 झाडांची लागवड, मिळणार पैसाच पैसा!

Last Updated:

पारंपरिक पद्धतीने शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी आहे हे लक्षात आल्यावर मोहगनी या झाडाची शेती केली आहे. या मोहगणी झाडांच्या विक्रीतून शेतकऱ्याला 60 ते 70 लाखांचा नफा मिळणार आहे.

+
News18

News18

सोलापूर : पारंपरिक पद्धतीला बगल देत शेतकरी शेतीमध्ये नवीन प्रयोग करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील अनवली गावातील शेतकऱ्याने असाच एक प्रयोग केला आहे. पारंपरिक पद्धतीने शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी आहे हे लक्षात आल्यावर मोहगनी या झाडाची शेती केली आहे. या मोहगणी झाडांच्या विक्रीतून शेतकऱ्याला 60 ते 70 लाखांचा नफा मिळणार आहे.
अनवली गावातील तरुण शेतकऱ्याचे नाव संतोष मेटकरी आहे. एका एकरात 500 मोहगणी झाडांची लागवड केली त्यांनी केली आहे. एका झाडाची किंमत 75 रुपये इतकी आहे. एका एकरात या झाडांची लागवड 8 बाय 9 वर केली आहे. तर एका एकरात मोहगणी लागवडी साठी संतोष मेटकरी यांना 60 ते 70 हजार रुपये खर्च आला आहे.
advertisement
 या मोहगनी झाडांच्या लाकडाला मागणी चांगली आहे. मोहगनी झाडांच्या लाकडीचा वापर फर्निचर बनवणे, कॅबिनेटरी बनवणे तसेच इतर लाकडी वस्तू बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. या लाकडाचा वापार पाण्यातील जहाज बनवण्यासाठी सुध्दा वापर केला जातो. मोहगनच्या लाकडाला 100 वर्ष सुद्धा पाण्यात ठेवले तरी तो खराब होत नाही. हे झाड तयार होण्यासाठी 10 ते 13 वर्षाचा कालावधी लागतो. तर याची विक्री प्रति घनफूट 500 ते 600 रुपये दराने होते.
advertisement
आधुनिक काळात मोहगनी झाडांची शेती शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरत आहे. पर्यावरणाला हानी न पोहोचवता जमिनीचा वापर करून शेतकरी आज मोहगणी झाडांची शेती करत आहेत. 500 झाडांच्या विक्रीतून 60 ते 70 लाखांचा नफा मिळणार असल्याची माहिती तरुण शेतकरी संतोष मेटकरी यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Mahogany Tree Farming : पारंपरिक शेती पद्धतीला बगल, शेतकऱ्याने केली 500 झाडांची लागवड, मिळणार पैसाच पैसा!
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement