शेतकऱ्यांना सुख मिळेना! अवकाळी पुन्हा येणार, राज्यातील या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका

Last Updated:

Wheather Update : सध्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये तापमानात वाढ होत असून, नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. काही ठिकाणी तर तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात येत्या आठवड्यात काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई : सध्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये तापमानात वाढ होत असून, नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. काही ठिकाणी तर तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात येत्या आठवड्यात काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 3 मे ते 10 मे दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग आणि किरकोळ पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
ज्या जिल्ह्यांना अधिक प्रभाव
कोकण, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील काही दिवस वातावरणात ढगाळपणा जाणवेल.या भागांमध्ये एखाद्या दिवशी विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण
मुंबईत सकाळी आकाश ढगाळ राहील, तर दुपारी हवामान निरभ्र होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा जाणवू शकतो.मात्र,जोरदार पावसाचा इशारा दिलेला नाही.
advertisement
तापमानात थोडी घट अपेक्षित
हवामानतज्ज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट नाही, तसेच रात्रीही फारसा उकाडा जाणवत नाही. मात्र शनिवारपासून पुढील आठवड्यात कमाल तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा काहीसे कमी होतील.” विदर्भातील काही भागांमध्ये सध्या उष्ण हवामान असून, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांत उष्म्याचा प्रभाव अधिक जाणवत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांना सुख मिळेना! अवकाळी पुन्हा येणार, राज्यातील या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका
Next Article
advertisement
ZP Election: आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठा निर्णय
आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठ
  • मतदारांच्या बोटावर लावलेली मार्करची शाई सहज पुसली जात असल्याचे आरोप

  • निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत मतदारांचा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार

View All
advertisement