शेत फुलणार! मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प कधी सुरू होणार? मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी महत्त्वाची घोषणा केली.
मुंबई : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, उल्हास खोऱ्यातील तब्बल ५४ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण केला जाईल. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू होऊन सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाईल. या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
दुष्काळावर मात करण्यासाठी मोठी पावले
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कृष्णा खोऱ्यातील पाणी आधीच मराठवाड्यात आणले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात सांगली-कोल्हापूरचे पाणी उजनीपर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार आहे. तसेच, उल्हास खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा आराखडा या प्रदेशासाठी ‘गेमचेंजर’ ठरेल. गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असल्याने या प्रकल्पातून पाण्याची उपलब्धता वाढणार असून दुष्काळाशी सामना करणे सोपे होईल, असे ते म्हणाले.
advertisement
कृषी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न
यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील ८ हजार ५५० गावांपैकी ४ हजार २५१ गावांतील सुमारे १६.८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. अधिकृत आकडेवारीनुसार, ओल्या दुष्काळामुळे मागील तीन महिन्यांत २७० आणि आठ महिन्यांत ७०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सर्वाधिक १७२ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या.
advertisement
सरकारने जाहीर केले की, अतिवृष्टीत प्राण गमावलेल्या आणि शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. “मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ५४ टीएमसी पाण्याचा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सिंचनाच्या पायाभूत सुविधा उभारणे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणे, हेच आमचे प्राधान्य आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, मराठवाड्यातील दुष्काळाशी सामना करण्यासाठी ५४ टीएमसी पाण्याचा प्रकल्प आशेचा किरण ठरत आहे. या प्रकल्पामुळे पाण्याची टंचाई कमी होऊन सिंचनाच्या सोयी वाढतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि शेती उत्पादनाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 1:25 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेत फुलणार! मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प कधी सुरू होणार? मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं