सकाळी 11 वाजता पैसे येणार
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित झाला होता. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा होती. सोशल मीडियावर, विविध पोर्टल्सवर हप्त्याच्या तारखांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. परंतु प्रत्यक्षात कोणतीही अधिकृत घोषणा होत नव्हती, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी होती. आता कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल.
advertisement
या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील वाराणसी दौऱ्यावर असतील. वाराणसी येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमातच या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी सुमारे 9.3 कोटींहून अधिक शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळणार आहे.
हप्त्याचे स्टेटस कसे तपासायचे?
जर तुम्हाला तुमच्या खात्यात हप्ता आला आहे का? याची माहिती घ्यायची असेल, तर पुढीलप्रमाणे स्टेप्स फॉलो करा:
सर्वप्रथम PM Kisan योजनेच्या https://pmkisan.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जा.
मुख्यपृष्ठावरील ‘Farmer Corner’ या विभागात ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा.
नंतर तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) टाका.
जर तो माहीत नसेल, तर ‘Know Your Registration Number’ या लिंकवर क्लिक करा.
आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन नंबर मिळवा.
नंतर Captcha कोड भरा आणि ‘Get OTP’ वर क्लिक करा.
तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून ‘Get Data’ वर क्लिक करा.
यानंतर तुमच्या नावासह अर्जाची संपूर्ण माहिती दिसेल. हप्ता जमा झाला आहे की नाही, याचा तपशीलही येथे मिळेल.
तसेच जर अर्जामधील एखादी माहिती चुकली असेल किंवा अपडेट करायची असेल, तर ‘Update Your Details’ या बटणावर क्लिक करून योग्य बदल करू शकता.
दरम्यान, पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ही योजना शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये 6 000 रुपयांची थेट आर्थिक मदत देते. या मदतीचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी थोडाफार आर्थिक आधार मिळावा. आता 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या हप्त्याच्या वितरणामुळे अनेकांना खरीप हंगामात दिलासा मिळणार आहे.