आजची बेदाणा आवक
सांगली मार्केटमध्ये आज एकूण 3721 क्विंटल आवक झाली. यापैकी 2947 क्विंटल हिरव्या बेदाण्याची आवक होऊन त्यास प्रतीनुसार 33 हजार ते 42 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच 736 क्विंटल पिवळ्या बेदाण्याची आवक होऊन त्यास 39000 रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला. तसेच काळ्या बेदाण्याची 38 क्विंटल इतकी सर्वात कमी आवक होऊन त्यास 4000 ते 13400 रुपये दरम्यान सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
यंदाही द्राक्ष हंगाम संकटात
सध्या शिल्लक बेदाणा कमी आणि द्राक्ष हंगामही अडचणीत असल्यामुळे बेदाण्याचे दर तेजीत राहातील, असा बेदाणा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी सांगली मार्केटमध्ये जास्तीत जास्त बेदाणा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती सुजय शिंदे यांनी केले.
Location :
Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
First Published :
November 27, 2025 9:00 PM IST






