परंपरेने शेतकऱ्यांमध्ये घेवडा हे पीक फारसे लाभदायक नाही, अशी धारणा होती. पिकाचा खर्च, कीड-रोगांचा त्रास आणि बाजारातील अनिश्चितता या कारणांमुळे अनेकजण हे पीक घेण्यास टाळाटाळ करत होते. मात्र या सर्व तक्रारींकडे दुर्लक्ष करत घोटकर यांनी सव्वा एकर जागेत घेवड्याची उभारीक्षम लागवड केली. ठिबक सिंचन, योग्य वेळेची निगा आणि रोगनियंत्रणाचे काटेकोर नियोजन यामुळे त्यांच्या पिकाला उत्तम वाढ मिळाली. परिणामी अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन मिळाले.
advertisement
मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये पाठवायचं कसं? कांद्याचा भाव कोसळला, हतबल शेतकऱ्याची व्यथा Video
घोटकर यांची आणखी एक खास बाब म्हणजे ते वर्षात दोनदा हे पीक घेतात. एका सीजनमध्ये चांगला नफा मिळाल्यानंतर त्यांनी दुबार पेरणीचा प्रयोग केला, आणि तोही यशस्वी ठरला. सात एकर शेती असूनही मर्यादित क्षेत्रात उच्च उत्पन्न मिळवता येते हे दाखवून देणे हा त्यांचा उद्देश होता. आज त्यांची ही पद्धत स्थानिक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी बनली आहे.
उत्पादनाबाबत विचारले असता घोटकर यांनी सांगितले की, वाघ्या गोल्डन वाण असणाऱ्या या घेवड्याच्या लागवडीद्वारे ते एकूण तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत वार्षिक निव्वळ उत्पन्न मिळवतात. बाजारभाव चांगला मिळाल्यास ही कमाई आणखी वाढते. त्यांच्या म्हणण्यानुसार, खर्चाचे नियोजन योग्य केले आणि शेतीत आधुनिक तंत्रांचा वापर वाढवला तर कमी क्षेत्रातही मोठा फायदा मिळू शकतो.
आज त्यांच्या या घेवडा मॉडेलने नित्रुड परिसरातील इतर शेतकऱ्यांना नवीन दिशा दिली आहे. पारंपरिक पिकांपासून दूर जात नाविन्यपूर्ण शेती स्वीकारण्याची प्रेरणा या प्रयोगातून मिळत आहे. बदलत्या हवामानाचा सामना करताना असे प्रयोगशील मॉडेल भविष्यात शेतीला नवीन बळ देणारे ठरतील, असा विश्वास कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.





