TRENDING:

सरकार ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना देतय 1.50 लाख रुपयांपर्यंत अनुदान, अर्ज कसा अन् कुठे करायचा?

Last Updated:

Agriculture News : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पाणी बचतीला चालना मिळावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचनावर विशेष अनुदान योजना सुरू केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पाणी बचतीला चालना मिळावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचनावर विशेष अनुदान योजना सुरू केली आहे. ही योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत ‘टॉप अप’ स्वरूपात राबवली जाणार असून, शेतकऱ्यांना इतर सिंचन योजनांचा लाभ घेतल्यानंतरच अतिरिक्त अनुदानाचा फायदा मिळेल.
agriculture news
agriculture news
advertisement

योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेत पात्र शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी जास्तीत जास्त 97,000 रु तर तुषार सिंचनासाठी 47,000 पर्यंत अनुदान मिळू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’ आणि ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना’ यांचा लाभ घेणे बंधनकारक आहे.

अनुदानाची रचना

ठिबक सिंचन संचासाठी

अल्प/अत्यल्प भूधारक : प्रति थेंब अधिक पीक योजनेतून 55%, मुख्यमंत्री शाश्वत सिंचनातून 25%, आंबेडकर कृषी स्वावलंबनातून 10% — एकूण 90% किंवा 97,000 पर्यंत.

advertisement

बहुभूधारक : अनुक्रमे 45% + 30% + 15% — एकूण 90% किंवा 97,000 पर्यंत.

तुषार सिंचन संचासाठी:

अल्प/अत्यल्प भूधारक : 55% + 25% + 10% — एकूण 90% किंवा 47,000 पर्यंत.

बहुभूधारक : 45% + 30% + 15% — एकूण 90% किंवा 47,000 पर्यंत.

शेतकऱ्यांना होणारे फायदे

सिंचनासाठी लागणारा मोठा खर्च सरकारकडून उचलल्याने आर्थिक ओझा कमी होईल.

advertisement

ठिबक व तुषार पद्धतीमुळे पाणी बचत होईल आणि पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळेल.

उत्पादनक्षमता वाढेल, कारण पिकांना वेळेवर आणि नियंत्रित सिंचन मिळेल.

खर्च कमी व उत्पन्न जास्त झाल्यामुळे शेती अधिक फायदेशीर आणि टिकाऊ ठरेल.

शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारतील, ज्यामुळे जीवनमान उंचावेल आणि शेतीत शाश्वत विकास साधला जाईल.

पात्रता व अटी काय?

advertisement

लाभार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असावा.

दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य (6 हेक्टर मर्यादा लागू नाही).

दुर्गम भागातील 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमिनीच्या शेतकऱ्यांनी मिळून अर्ज करता येईल.

एकदा लाभ घेतल्यास पुढील 5 वर्षे पुन्हा लाभ मिळणार नाही.

याआधी अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेतल्यास या योजनेचा फायदा मिळणार नाही.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

advertisement

शेतकरी ओळख प्रमाणपत्र (महाडीबीटीसाठी आवश्यक)

जात प्रमाणपत्र

बँक पासबुक (आधार लिंक असलेले खाते)

शेतकऱ्याचा फोटो

शेतजमिनीचा नकाशा (गरजेनुसार)

स्वयंघोषणा पत्र (इतर योजनांचा लाभ घेतला नसल्याचे)

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

राज्य सरकारने महाडीबीटी योजनांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही पद्धत लागू केली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी त्वरित महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक, तालुक्याच्या पंचायत समितीतील कृषी विभाग किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा.

मराठी बातम्या/कृषी/
सरकार ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना देतय 1.50 लाख रुपयांपर्यंत अनुदान, अर्ज कसा अन् कुठे करायचा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल