TRENDING:

Magel Tyala Shet Tale yojana : आता उन्हाळ्यात शेती फुलवा! सरकार शेत तळ्यासाठी देतय अनुदान; कागदपत्रे, अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Last Updated:

Agriculture Scheme : राज्यभरात उन्हाळ्याचा प्रभाव वाढत असताना, अनेक भागांमध्ये जलसाठे कमी होत आहेत. विशेषतः डोंगराळ, मुरमाड आणि कोरडवाहू जमिनीत विहिरी किंवा बोरवेलमधून पुरेसे पाणी मिळणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर, जलसंधारणासाठी राज्य सरकारने शेततळे अनुदान योजना राबवली आहे. "मागेल त्याला शेततळे" या उपक्रमाअंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी शेततळे तयार करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यभरात उन्हाळ्याचा प्रभाव वाढत असताना अनेक भागांमध्ये जलसाठे कमी होत आहेत. विशेषतः डोंगराळ, मुरमाड आणि कोरडवाहू जमिनीत विहिरी किंवा बोरवेलमधून पुरेसे पाणी मिळणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर, जलसंधारणासाठी राज्य सरकारने शेततळे अनुदान योजना राबवली आहे. "मागेल त्याला शेततळे" या उपक्रमाअंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी शेततळे तयार करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
News18
News18
advertisement

 योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून,अर्ज करण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत जसे की,

जमिनीचे निकष - अर्जदाराकडे किमान 0.6 हेक्टर जमीन असणे आवश्यक.

पूर्वी अनुदान न घेतलेले असावे - अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

सातबारा नोंदणी अनिवार्य - शेततळे तयार झाल्यानंतर, त्याची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करणे गरजेचे आहे.

advertisement

मंजूर मोजमाप पाळणे बंधनकारक - शासनाने दिलेल्या मोजमापानुसारच शेततळे खोदले पाहिजे.

शेततळ्याची देखभाल शेतकऱ्यांची जबाबदारी -तयार झाल्यानंतर, त्याचे संरक्षण आणि निगा राखणे गरजेचे आहे.

सरकारी नियमानुसार काम करावे लागेल - कृषी विभागाने सांगितलेल्या जागेवरच शेततळे तयार करणे आवश्यक.

लाभार्थ्यांची निवड कशी केली जाते?

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते. मात्र, खालील गटांना प्राधान्य दिले जाते. जसे की, अत्यंत गरजू व गरीब शेतकरी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे वारस

advertisement

अन्य अर्जदारांची निवड ‘प्रथम अर्ज, प्रथम संधी’ तत्त्वावर दिली जाते.

शेततळे अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

सातबारा उतारा आणि आठ-अ उतारा

शेततळ्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचे कोटेशन

पंपसाठी अधिकृत कंपनीचा टेस्टिंग रिपोर्ट

जात प्रमाणपत्र (SC/ST साठी)

हमीपत्र व पूर्व संमती पत्र

लॉटरी जिंकल्यानंतर शेतकरी करारनामा

बँक पासबुक आणि मोबाइल क्रमांक

शेततळे खोदण्यासाठी मिळणारे अनुदान

advertisement

शेततळ्याचे मोजमाप आणि आकारानुसार राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते

15 × 15 × 3 मीटर – 28,275 रुपये

20 × 20 × 3 मीटर – 41,218 रुपये

20 × 25 × 3 मीटर – 31,598 रुपये

25 × 25 × 3 मीटर – 49,671 रुपये

25 × 25 × 3 मीटर (वैकल्पिक) - 58,700 रुपये

advertisement

30 × 25 × 3 मीटर – 67,728 रुपये

30 × 30 × 3 मीटर – 75,000 रुपये

शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा.‘सिंचन, साधने व सुविधा’ हा पर्याय निवडा.‘वैयक्तिक शेततळे’ हा पर्याय निवडा.शेततळ्याचा प्रकार इनलेट व आउटलेट असलेला किंवा नसलेला निवडा.शेततळ्याचे मोजमाप आणि स्लोप निवडा.

अर्ज सबमिट करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अनुदान मिळण्याची प्रक्रिया कशी चालते?

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने होते. यशस्वी अर्जदारांना SMS द्वारे सूचना दिली जाते. कागदपत्रे सबमिट केल्यानंतर कृषी अधिकारी स्थळ तपासणी करतात. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात अनुदान जमा होते.

मराठी बातम्या/कृषी/
Magel Tyala Shet Tale yojana : आता उन्हाळ्यात शेती फुलवा! सरकार शेत तळ्यासाठी देतय अनुदान; कागदपत्रे, अर्जप्रक्रिया जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल