योजनेचा उद्देश काय?
शेतीला सतत जंगली डुकरं, हरणं, माकडं, गाय-शेळ्या यांच्याकडून धोका असतो. या प्राण्यांपासून शेत वाचवण्यासाठी काटेरी तारांचं कुंपण अत्यावश्यक आहे. परंतु खूपशा शेतकऱ्यांना त्यासाठी आर्थिक अडचणी येतात. यासाठीच सरकारने ही योजना आणली असून त्याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळणं, शेती उत्पन्न टिकवणं आणि शेतीतील मानसिक तणाव कमी करणं आहे.
advertisement
योजनेचे ठळक लाभ
90 टक्के अनुदान: शेतकऱ्यांना 2 क्विंटल काटेरी तार व 30 खांबांपर्यंत 90% अनुदान मिळतं.
पिकांचं संरक्षण: जंगली प्राण्यांपासून शेताचं संपूर्ण संरक्षण.
खर्चात बचत: कुंपणासाठी स्वतःच्या खिशातून फारसा खर्च लागत नाही.
मानसिक शांतता: दिवस-रात्र पिकांच्या सुरक्षेची काळजी कमी होते.
चोरीला आळा: कुंपणामुळे शेतातून चोरी होण्याची शक्यता कमी होते.
पात्रता आणि अटी
अर्जदाराने शेतजमिनीचा मालक किंवा अधिकृत बटाईदार असावा.
जमीन अतिक्रमणमुक्त असावी.
संबंधित शेत वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावा.
लाभासाठी फक्त एका हंगामासाठी अर्ज करता येतो.
आवश्यक कागदपत्रे
7/12 आणि 8-अ उतारा
आधार कार्डाची झेरॉक्स
ग्रामपंचायतची जमीन वापराची शिफारस
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र (जमिनीचा परिसर वन क्षेत्रात नसल्याचा)
बँक पासबुक झेरॉक्स व IFSC कोड
अर्ज प्रक्रिया कशी कराल?
तुमच्या पंचायत समिती कार्यालयात किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज घ्या. विहित नमुन्यात अर्ज भरून सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन स्वरूपात सादर करा.अर्ज सादर केल्यानंतर,लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते.
निवड झाल्यास, अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
तसेच अर्ज सादर करताना पोहोच पावती घ्यायला विसरू नका.
तार कुंपण अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असून, विशेषतः जंगली प्राण्यांचा त्रास ज्या भागात अधिक आहे तिथे ती वरदान ठरते. थोडी मेहनत आणि योग्य माहिती घेऊन अर्ज सादर केल्यास शेतकरी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवू शकतात. आपल्या शेताचं संरक्षण करायचं असेल, तर ही योजना नक्कीच एक योग्य पर्याय आहे. अर्ज करताना स्थानिक कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्या.