सध्या सोलापूर जिल्हा सह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण किंवा पावसाचे वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये डाळिंबावर खोड किडा, भुंगेरे, फळ पोखरणारी अळी या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. डाळिंबाच्या झाडाची पाने, फांद्या पिवळे पडलेले दिसल्यास हे लक्षण खोडकिडा याचे आहे. तसेच खोडावर आणि फांद्यावर सुईसारख्या आकाराचे लहान छिद्र दिसतात.
Farmer Success Story : शेतकऱ्यानं करून दाखवलं, शेतातून आता महिन्याला कमवतोय 1 लाख रुपये, Video
advertisement
खोडकिडा रोगाचे व्यवस्थापन करायचे असेल तर डाळिंबाची बाग स्वच्छ ठेवली पाहिजे. यामध्ये पाणी साठवण होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. जर शेतामध्ये पाणी साठवत असेल तर त्याचा लवकरात लवकर निचरा करावा. फांद्यावर किंवा खोडावर हा रोग झालेला असेल तर नष्ट करावे.
मर रोगाची लक्षणे आणि व्यवस्थापन
मर रोग हा जमिनीत वास्तव्य करणाऱ्या फ्युजारीन उडम या बुरशीमुळे होतो. अचानक झाडाचा शेंड्याकडील भाग हा पिवळा पडण्यास सुरुवात होते आणि काही दिवसानंतर ते पूर्ण झाड पिवळे पडून वाळून जातात. तसेच फळे असलेल्या फांद्या सुद्धा वाळून जातात परंतु न गळता तशाच त्या झाडाला लटकलेल्या असतात. जर या रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल तर प्रोपिकोनाझोल 25 टक्के इसी, क्लोरोपायरीफॉस 20 टक्के इसी प्रति लिटर पाण्यात मिसळून हे पाणी पाच ते दहा लिटर प्रमाणात प्रत्येक झाडाभोवती ड्रेसिंगच्या माध्यमातून द्यावेत.
अशा पद्धतीने डाळिंब पिकाची काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना डाळिंबापासून अधिकाधिक उत्पन्न मिळेल असा सल्ला सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे यांनी दिला आहे.





